Jump to content

पान:संतवचनामृत.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४.. संतवचनामृत. लक्षण ज्याच्या अंगांत असेल त्यासच देवाची प्राप्ति होईल ( क्र. १३५). एक वेळ देवास पाहिल्यावर मग भलत्या गावांस गेले असतांही हरकत नाहीं; कारण मग देव नेहमी जवळ असतोच ( क्र. १३७). अमृतलिंग केशव हा सदैव नामदेवांच्या चित्तांत असल्याने त्यांस अखंडित तृप्ति प्राप्त झाली. डावीउजवीकडे, आणि मागेपुढे, देवाचे चरण जोडावे अशी नामदेवांनी इच्छा प्रदार्शत केल्याबरोबर (क्र. १४०), नामदेवांनी पहावे तिकडे चारी दिशांस दिशामित भरलेला हरि त्यांस दिसू लागला (क्र. १४१). हे देवाचे स्वरूप आंधळ्यांसही दिसू शकते, व बहिन्यांसही त्याचा श्रवणानुभव येतो असें नामदेव म्हणतात ( क्र. १४२ ). देवाचे नामस्मरण केल्यावर देव जर पूजेचा संभार घेऊन सामोरा येणार नाही तर माझें मस्तक छेदा असें नामदेवांनी म्हटले आहे (क्र.१४४). बसून नाम आळविले असता देव पुढे उभा राहतो, व प्रेमाच्या भराने उभे राहून गर्जना केली असतां देव भक्तांपुढे नाचतो (क. १४५). गरुडाच्या संचाराने दाही दिशा भरून जाऊन कोटिसूर्यप्रभामय जगज्जीवनाचे भक्तांस दर्शन होतें असें नामदेव म्हणतात (क्र. १४७ ). आपण आपल्यास पाहण्यास चंद्रसूर्याचे कारण नाहीं; महाप्रळयांत सप्तसागर एकवटाचे तसा देव सर्व विश्व व्यापून राहतो ( क्र.१४८ ). उन्मन्यवस्थेत पाहिले असतां धिधिम् तुरे वाजून अनाहतध्वनीच्या गर्जनेमध्ये, चंद्रसापलीकडच्याही तेजांत ( क्र.१४९), केशव तेचि नामा व नामा तोच केशव असा अनुभव नामदेवांस प्राप्त झाला असे ते सांगतात (क्र. १५० ). .२०. नामदेवांचे समकालीन जे संत होते त्यांच्या अभंगांचा थोडक्यांत येथे विचार करणे जरूरीच आहे. नामदेवांची परीक्षा करणारा गोरा कुंभार याने नामदेवास अनुभवप्राप्ति झाल्यावर आपल्यामध्ये व त्याच्यामध्ये भेद उरला नाही असें सांगितले ( क्र. १.). पाहता पाहतां आपली खेचरी मुद्रा लागून जाते (क्र. २ ); व जयजय झनकून झांगट वाजते असे ते म्हणतात (क्र. 3). आपण जीवन्मुक्त होऊन कोणासच आपली स्थिति कळू देऊ नये, असेंहि ते सांगतात (क्र. ८). नामदेवांचे गुरु विसोबा खेचर यांनी नामदेवास तूं देव पाहिला असें म्हणशील, तर ते बोलणे खोटें आहे असे सांगितलें; जोपर्यंत आपला अहंकार गेला नाही, तोपर्यंत आत्माराम भेटणे शक्य नाही (क्र. १). अच्युत हरे, केशव हरे, ही नामें उच्चारिली असतां पर्वतप्राय पापराशि दग्ध होतील (क्र. 3); असें म्हणून नामदेवाच्या श्रवणांत मात सांगून त्याच्या मस्तकावर विसोबांनी हात ठेविला, व त्यांस पदपिंडविवर्जित