Jump to content

पान:संतवचनामृत.pdf/252

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

$ १२०] . साक्षात्कार. २०१ ११७. डोळ्याचा डोळा उघडा पाहिल्यावर जन्ममरणास पुनः .. येणार नाही अशी खात्री पटली.. जन्ममरणाचे तुटले सांकडे । कैवल्य रोकडे उभे असे ॥ डोळियाचा डोळा उघड दाविला। संदेह फिटला उरी नुरे॥ एकाजनार्दनीं संशयचि नाहीं। जन्ममरण देही पुन्हां न ये॥ ११८. चिन्मय आत्मज्योत पाहून एकाजनार्दनाची भ्रांति निरसली. त्रिभुवनींचा दीपप्रकाशु देखिला । हृदयस्थ पाहिला जनार्दन ॥ दीपाची ती वाती वातीचा प्रकाश । कळिकामय दीपदेही दिसे॥ चिन्मय प्रकाश स्वयं आत्मज्योति। एकाजनार्दनींभ्रांति निरसली॥ ११९. एकाजनार्दनास सर्वत्र पहाट होऊन अवघा लखलखाट झाला आहे. पाहले रे मना पाहले रे। बुद्धिबोधे इंद्रिया सम जाले रे ॥ नयनी पहातां न दिसे बिंब । अवघा प्रकाश स्वयंभ ॥ एकाजनार्दनीं पहांट । जनीं वनीं अवनी लखलखाट ॥ १२०. जिकडे पाहे तिकडे बोधभानूचा उदय होऊन अस्त मानाचे आडनावही उरले नाही. बोधभानु तया नाही माध्यान्ह । सायंप्रात ही तेथे कैंचा अस्तमान॥ १ संकट, २ मूर्तिमंत. ३ बाकी. ४ ज्योतिरूप. ५ उजाडलें. ६ पृथ्वी. सं...१४