________________
६५८] नामस्मरण आणि भक्ति. मिळेल तरी खावे अन्न । अथवा पण ती भक्षून ॥ जाईल तरी जावो प्राण । परि न संडावें कीर्तन ॥ किरकिर आणूं नये पाठीं। बोलूं नये भलती गोष्टी ॥ स्वये उभा राहून । तेथें करी मी कीर्तन ॥ घातं आलिया निवारी। माता जैसी बाळावरी ।। बोले उद्धवासी गुज । एकाजनार्दनी बीज ॥ ५७. परमपावन सगुणचरित्रांचे वर्णन करावें. सगुणचरित्रं परम पवित्रे सादर वर्णावीं । सज्जनवृंदें मनोभावें आधी वंदावी ॥ संतसंगे अंतरंगे नाम बोलावें। कीर्तनरंगी देवासन्निध सुखे डोलावें ॥ भक्तिज्ञानाविरहित गोष्टी इतरा न कराव्या। प्रेमभरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या॥ जेणेकरूनि मूर्ति ठसावे अंतरि श्रीहरिची । ऐशी कीर्तनमर्यादा हे संतांच्या घरची ॥ अद्वयभजने अखंडस्मरणे वाजवी करटाळी। एकाजनार्दनी मुक्ति होय तात्काळी ॥ ५८. नवविधाभजनाने कोण कोण पावन झाले ? नवविधा भक्ति नव आचरती । त्याची नामकीर्ति सांगूं आतां ॥ एक एक नाम घेतां प्रातःकाळीं। पापा होय होळी क्षणमात्रे ॥ श्रवणे परीक्षिति तरला भूपति । सात दिवसां मुक्ति जाली तया ॥ A nthemuner १ संकट. २ आदरयुक्तः ३ समुदाय.. ४ विवरणकरणे, स्पष्ट करणे..