________________
६५२ } नामस्मरण आणि भक्ति. . १८७ ५० भावभक्तीवांचून केलेले सर्व पुण्य म्हणजे विटंबनाच होय. राजाला आळस संन्याशाला सायास।विधवेसी विलास विटंबना। व्याघ्रासी शांतता गाईसी उग्रता । वेश्येसी हरिकथा विटंबना ॥ दानेविण पाणि घ्राणेंविण घोणी । नामेविण वाणी विटंबना ॥ एकाजनार्दनीं भावभक्तीविना । पुण्य केले नाना विटंबना ॥ ५१. नित्य नवा कीर्तनांत कसा रंग वोढवत आहे !' नित्य नवा कीर्तनी कैसा वोढवला रंग। श्रोता आणि वक्ता स्वयें जाला श्रीरंग ॥ आल्हाद वैष्णव करिती नामाचा घोष। हरिनाम गर्जतां गगनीं न माये हरुष । पदोपदी कीर्तनी निवताहे जन मन । आवडी भुकेली तिने गिळिले गगन ॥ एकाजनार्दनीं गातां हरिचे नाम। निमाली इंद्रिये विषय विसरली काम ॥ ५२. हरिकीर्तन चाललें असतां आंतबाहेर देव उभा राहतो. आवडी करितां हरिकीर्तन । हृदयीं प्रगटे जनार्दन ॥ थोर कीर्तनाचे सुख । स्वयं तिष्ठे आपण देख ॥ घातं आलिया निवारी । चक्र गदा घेउनि करीं ॥ कीर्तनी होऊन सादर । एका जनार्दनी तत्पर ॥ १ हात. २ नाक. ३ प्राप्त होणे. ४ आनंद. ५ हल्ला, संकट.