________________
नामस्मरण आणि भक्ति. . ४४. चिंतनाने सर्व कार्य सिद्ध होते. चिंतने नासतसे चिंता । चिंतने सर्व कार्य ये हातां।.. चितने मोक्ष सायुज्यता । घर शोधीतसे ॥ ऐसे चिंतनाचे महिमान । तारिले अधम खळ जन । चिंतने समाधान । प्राणिमात्रां होतसे ॥ चिंतन तुटे आधिव्याधी । चिंतने तुटतसे उपाधि। चिंतने होय सर्व सिद्धि । एका जनार्दनाचे चरणीं ॥ ४५. चिंतनाने काळाचे भय नाहींसें होतें. हरे भवभय व्यथा चिंतने । दूर पळती नाना विघ्ने। कलिकल्मष बंधने । न बाधी चिंतने ॥ करा करा म्हणोनि लौहो। चिंतनाचा निर्वाहो । काळाचा तो बिहों। दूर पळे चिंतने ॥ हीच माझी विनवणी । चिंतन करा रात्रंदिनीं । शरण एका जनार्दनीं । रामनाम चिंतावे॥ ४६. चिंतनाने देवाचें साहाय्य प्राप्त होतें. चिंतन ते सोपे जगीं। रामकृष्ण म्हणा सत्संगी। उणे पडों नेदी व्यंगीं । देव धांवे चिंतने ॥ चिंतन करितां द्रौपदी। पावलासे भलते संधीं। ऋषीश्वरांची मांदी । तृप्त केली क्षणमात्रे ॥ चिंतने रक्षिले अर्जुना । लागों नेदी शक्तिबाणा । होउनी अंकणों । रथारूढ बैसला॥ चिंतने प्रल्हाद तारिला । जळी स्थळी सांभाळिला । एकाजनार्दनीं भला । चिंतनाचा अंकित ॥ १ मोठेपणा. २ मानसिक चिंता, व रोग. ३ दूर होणे. ४ कलीतील पाप. ... ५ छंद. ६ व्यवसाय. ७ भय. ८ समुदाय. ९ अंकित.