Jump to content

पान:संतवचनामृत.pdf/219

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७६ संतवचनामृत : एकनाथ. [६१९ चंदनाचे संगें हिंगण वसती । परि चंदनाची याती वेगळीच ॥ एकाजनार्दनी हा अभाविकाचा गुण । वमनासमान लेखू आम्हीं॥ २०, अरण्यांत सूकराप्रमाणे मठ करून कां राहतोस ? वरुषला मेघ खडकावरुता । चिखल ना तत्त्वतां थेंब नाहीं॥ वायां तो प्राणी आला नरदेहा। गेला वायां पहा भक्तिवीण ॥ अरण्यांत जैशी सूकरें बैसतीं । तैसें मठाप्रति करूनि बैसे ॥ उदय होतांचि लपते उलूक । तैसा तो मूर्ख समाधि बैसे ॥ एकाजनार्दनी वायां गेले सर्व । संसार ना देव दोन्ही शून्य ॥ २१. मानभावाप्रमाणे आंतबाहेर काळेपण कां स्वीकारतोस ? होउनी मानभाव । अवघा बुडविला ठाव ॥ नाही चित्त शुद्ध गति । द्वेष देवाचा करती ॥ धरती उफराटी काठी । रांडापोरे भोंदी वाटीं ॥ नेसोनियां काळेपण । अंगा लाविती दूषण ॥ एकाजनार्दनी देवा । जळो जळो त्यांची सेवा ॥ २२. बोकडाचे वैराग्य, कुक्कुटाची समाधि, व मर्कटाच्या चेष्टा घेऊन काय करावयाच्या ? काय ते वैराग्य बोकडाचे परी। भलतिया भरी पडतसे ॥ काय ती समाधि कुक्कुटाचे परी। पुचि उकरी लाभ नेणें ॥ बैसोनि आसनी वाउगें ते ध्यान । सदा लक्षी मान आपुलाचि॥ घालूनियां जेठा बैसतो करंटा। करितसे चेष्टा मर्कटापरी॥ १ ओक. २ मानणे. ३ डुकर. ४ घुबड. ५ काळी वस्त्रे वापरणारा एक पंथ. ६ फसवणे. ७ कोंबडा.