Jump to content

पान:संतवचनामृत.pdf/215

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७२ ___ संतवचनामृत : एकनाथ. साधनाची आंटी न करितां गोष्टी । हृद्यसंपुष्टी दाविला देव॥ एकाजनार्दनीं एकपणे शरण । नकळे महिमान कांहीं मज ॥ ७. जनार्दनाच्या कृपेने मी उघडे परब्रह्म अनुभवीत आहे. सर्वभावे दास झालो मी उदास । तोडिला मायापाश जनार्दनें ॥ माझे मज दावियले माझे मज दावियले । उघडे,अनुभविले परब्रह्म॥ रविबिंबापरी प्रकाश तो केला । अंधार पळविला कामक्रोध ॥ एकाजनार्दनी उघडा बोध दिला। तोचि ठसावला हृदयामाजीं॥ ८. जग परब्रह्म पाहणे हेच गुरुकृपेचें वर्म होय. दृष्टी देखे परब्रह्म । श्रवणी ऐके परब्रह्म ॥ रसना सेवी ब्रह्मरस । सदा आनंद उल्हास ॥ गुरुकृपेचे हे वर्म । जग देखे परब्रह्म ॥ एकाजनार्दनी चराचर। अवघे ज्यासी परात्पर ॥ ९. गुरु हाच परमात्मा परेश असा ज्याचा विश्वास त्याचे घरी देव राबतो. गुरु परमात्मा परेशु । ऐसा ज्याचा दृढ विश्वासु ॥ देव तयाचा अंकिला। स्वये संचला त्याचे घरीं ॥ एकाजनार्दनीं गुरु देव । येथे नाहीं बा संशय ॥ १ त्रास. २ देव ठेवण्याची संबळी. ३ बिंबणे, बाणणे. ४ श्रेष्ठ देव. ५भरला.