________________
संतवचनामृत. केली त्या सर्वांचा उल्लेख आहे. हे लोक कर्नाटक, तेलंगण, कोंकण, देश वगेरे सर्व भागांतून आलेले दिसतात. त्यांतच प्रसिद्ध मुत्सद्दी हेमाडपंत, व महाराष्ट्राधिपति रामदेवराव जाधव, यांनी शके ११९८ मध्ये देवळास भेट देऊन जीर्णोद्धाराचे कामी बरीच मदत केली असे लिहिले आहे. रामदेवरावास तर "पांडरीफडमुख्य" असे म्हटले आहे. यावरून रामदेवरावाची विठ्ठलावर अतिशय भक्ति होती असे दिसून येते. असो. अशा रीतीने ज्या विठ्ठलाचे महत्त्व पंढरी येथे वाढत चालले होते त्याच्याच सांप्रदायांत ज्ञानेश्वरांप्रमाणेच नामदेवही निर्माण झाले, व विठ्ठलभक्तीचा प्रसार दीर्घकाल करण्याचे श्रेय ज्ञानदेवांस जरी लाधले नाही, तथापि त्यांच्यानंतर पन्नास वर्षे राहून नामदेवांनी विठ्ठलभक्तीचा वृक्ष फारच विस्तीर्ण केला, हे त्यांचे भाग्य होय. नामदेवरायांसारखा भक्त निर्माण झाला नसता, तर आजचे विठ्ठलभक्तीचे विस्तीर्ण स्वरूपही लोकांच्या नजरेस पडले नसते. नामदेवराय हे विठ्ठलभक्तीचा पाया होत असे म्हणण्यास काही हरकत नाही. १३. नामदेवाचा जन्म शके ११९२ मध्ये झाला असे त्यांच्याच एका अभंगावरून कळते (क्र. १). त्यांचा बाप दामाशेटी हा नरसीब्रह्मणी येथील राहणास शिंपी होता. नामदेव आपल्या लहान वयामध्ये फार हूड होता, व त्याचे आचरणही बरेच दुष्ट असावे असे दिसते. तो चोरांच्या संगतीस लागून त्यानें पुष्कळ वाटसरूंस लुबाडलें, व कित्येकांस ठारही मारले. " ब्राह्मण कापडी गरीब साबडी । केली प्राणघडी बहुतांची ।। चौन्यांशी राऊत नाम्याने मारिले । चहुंकड साले भयाभीत ॥" हा अभंग नामदेवांचाच आहे असे मानले तर वाल्मिक ऋषीप्रमाणेच नामदेव हाही एकवार वाटवधाच होता असे म्हणण्यास हरकत नाही. तो आंवढ्यास एकदां देवाच्या दर्शनास गेला असतां तेथें आलेल्या एका बाईने आपल्या मुलास उद्देशून उच्चारलेले करुणोद्वार ऐकून, व तिचा भ्रतार आपण चौऱ्यांशी स्वारांत मारला असे समजून, नामदेवास में दुःख झाले त्याच्या योगाने अत्यंत विव्हल होऊन त्याने आपल्या मानेवर सुरी मारली, व रक्ताची धार देवावर जाऊन धरिली. याच गोष्टीमुळे त्याचे लक्ष एकदां देवाकडे जे लागलें तें लागले. तो पंढरपुरास येऊन विठ्ठलाची भक्ति करूं लागला. एकदा ज्ञानेश्वरादिक संतांच्या भेटीत गोऱ्या कुंभाराने आपले थापटणे त्याच्या डोक्यावर मारुन तें मडकें कच्चे आहे. असें ठरविलें. (क्र.५), ही गोष्ट आळंदी येथे घडली असें दिसते. त्यामुळे नामदेवाचा मोठा मानभंग होऊन तो जो इंद्रायणीच्या पार