Jump to content

पान:संतवचनामृत.pdf/196

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६.] संतांची कृपा. १५३ पूर्वपुण्य फळा आलें । माझे माहरे भेटले ॥ सेना म्हणे झाला । धन्य दिवस आजि भला ॥ ८. माझ्यासारख्या जडजीवांचा उद्धार केला ही संतांची कृपा मी किती म्हणून वणू ! उदार तुम्ही संत । मायबाप कृपावंत ॥ केवढा केला उपकार । काय वानूं मी पामरे ॥ जडजीवां उद्धार केला । मार्ग सुपंथ दाविला ॥ सेना म्हणे उतराई । होतां न दिसे कांहीं ॥ ९. आज संतास पाहिले हा सोन्याचाच दिवस होय. आजि सोनियाचा दिवस । दृष्टी देखिले संतांस ॥ जीवां सुख थोर झाले । माझे माहेर भेटले॥ अवघा निरसला शीण । देखतां संतचरण ॥ आजि दिवाळी दसरा । सेना ह्मणे आले घरा ॥ १०. समर्थाचे बाळ समर्थ नसते काय ? अन्यायी अपराधी लडिवाळ संतांचा। तेथे कळिकाळाचा रीघे नाहीं ॥ समर्थाचे बाळ समर्थचि जाण। .. वागवी अभिमान म्हणतां त्याचे ॥ अन्यायाच्या राशी उदंड केल्या जरी। तरी क्षमा करी मायबापा ॥ कल्पतरुछाया बैसला सेना न्हावी।। दया ते वागवी बहु पोटीं॥ १ आईबाप, १ हीन, दीन. ३ अडाणी प्राणी. ४ दूर होणे. ५ प्रवेश.