________________
सेनान्हावी. १, दुर्जनाची सुखाने मानखंडणा करावी. मान करावा खंडण । दुर्जनाचा सुखे करून॥ लाथा हाणुनि घाला दुरी। निंदकासी झडकरी॥ त्याचा जाणावा विटाळ । लोकां पीडितो चांडाळ ॥ त्याची संगती जयास । सेना म्हणे नर्कवास ॥ २. धूम्रपान, पंचाग्निसाधन, न करितां केवळ नामाचेच चिंतन करा. नामाचे चिंतन श्रेष्ठ पैं साधन । जातील जळोनि महापापें ॥ न लगे धूम्रपान पंचाग्निसाधन । करितां चिंतन हरि भेटे ॥ बैसुनि निवांत करा एकचित्त । आवडी गावे गीत विठोबाचें ॥ सकळाहुनि सोपे हेचि पैं साधन । सेना म्हणे आण विठोबाची ॥ ३. क्षण एक वायां जाऊ न देता नारायणाचे स्मरण करावें. असाल तेथें नामाचे चिंतन । याहुनि साधन आणिक नाहीं ॥ सोडवील माझा भक्ताचा कैवारी । प्रतिज्ञा निर्धारी केली आम्हीं। गुण दोष याति न विचारी कांहीं । धांवे लवलाही भक्तकाजा॥ अवघे काळी वाचे म्हणा नारायण । सेना म्हणे क्षण जाऊन द्या। १ साह्यकर्ता. २ निश्चयपूर्वक. ३ लवकर.