________________
व ६१३] अनुभव. १४५ तुझे गेलें मढे । तुला पाहून काळ रडे ॥ उभी राहुनी अंगणीं । शिव्या देती दासी जनी ॥ ११. पंढरचिा चोर धरून त्यास सोहं शब्दाचा मारा केल्याबरोबर देव काकुळतीस येतो. धरिला पंढरीचा चोर । गळां बांधोनियां दोर ॥ हृदय बंदिखाना केला। आंत विठ्ठल कोंडिला ॥ शब्द केली जडाजुडी । विठ्ठलपायीं घातली बेडी। सोहं शब्दाचा मारा केला । विठ्ठल काकुळती आला ॥ जनी म्हणे बा विठ्ठला । जीवे न सोडी मी तुजला ॥ १२. नवऱ्यामुलाबरोबर व-हाड्यांस पक्कान्न मिळते, त्याप्रमाणे नामदेवाबरोबर जनाबाईस देव मिळाला. नोवरिया संगे व-हाडियां सोहोळा। मांडे पुरणपोळ्या मिळे अन्न ॥ परिसाचेनि संगै लोहो होय सोने । तयाची भूषणे श्रीमंतांसी ॥ जनी म्हणे जोड झाली विठोबाची। दासी नामयाची ह्मणोनियां ॥ १३. रक्तश्वेत, श्यामनीळ, शून्ये पहात असतांच जनीचे अनाहतनादश्रवण. शून्यावरि शून्य पाहे । तयावरि शून्य आहे॥ प्रथम शून्य रक्तवर्ण । त्याचे नांव अधःशून्य ॥ १जोड. २ लाखंड, १.