________________
- - १३८ संतवचनामृत : नरहरिसोनार. [४ ४. निशिदिनी होणाऱ्या अनाहतनादाला मन लुब्ध होऊन गेलें आहे. अनुहात ध्वनि करित निशिदिनीं । मन हे लुन्धुनि गेले तया ॥ अखंड हे मनीं स्मरा चिंतामणी । हृदयीं हो ध्यानी सर्वकाळ ॥ अखंड हे खेळे जपे सर्वकाळीं । हृदयकमळी आनंदला॥ प्रेम अखंडित निशिदिनी ध्यात । नरहरिसी पंथ दाखविला ॥ ५. नरहरि हा परमार्थात सुद्धा सोनाराचा धंदा करितो. देवा तुझा मी सोनार । तुझे नामाचा व्यवहार ॥ देह बागेसरी जाण । अंतरात्मा नाम सोने ॥ त्रिगुणाची करुनि मूस। आंत ओतिला ब्रह्मरस ॥ जीव शिव करुनि फुकी। रात्रंदिवस ठोकाठोकी । विवेक हातवडा घेऊन । कामक्रोध केले चूर्ण ॥ मनबुद्धीची कातरी । रामनाम सोने चोरी॥ शान ताजवा घेऊनि हातीं। दोन्ही अक्षरे जोखिंती॥ खांद्या वाहोनि पोतडी । उतरला पैलथंडी ॥ नरहरि सोनार हरिचा दास । भजन करी रात्रंदिवस ॥ १ रात्रंदिवस. २ सोनाराची शेगडी. ३ घातूंचा रस करण्याचे पात. ४ फुकणी. ५ तराजू. ६ वजन करणे. ७ पलीकडचे तीर.