________________
सांवतामाळी. १. संसाराची बोहरी करण्याविषयीं देवाजवळ सांवत्याची प्रार्थना. ऐकावे विठ्ठल धुरे। विनंति माझी हो सत्वरें ॥ करी संसाराची बोहरी । इतुके मागतो श्रीहरि ॥ कप्ट करितां जन्म गेला । तुझा विसर पडला ॥ माळी सांवता मागे संतान । देवा करी गा निःसंतान ॥ २. ब्राह्मणजन्म असता तर मी कांतच गुंतलों असतो. मली केली हीन याति । नाहीं वाढली महंती ॥ जरी असतां ब्राह्मणजन्म । तरी हे अंगी लागते कर्म ॥ स्नान नाहीं संध्या नाहीं । याति कुळ संबंध नाहीं ॥ सांवता म्हणे हीन याति । कृपा करावी श्रीपति ॥ ३. मला अनाथाला येथे न ठेवितां मला उचलून न्या असें. __ सांवता माळी म्हणतो. कां बा रुसलासी कृपालुवा हरि। तुजविण दुसरी भाकू ती कोण ॥ दीन रकै पापी हीन माझी याति । सांभाळा श्रीपति पांडुरंगा ॥ मोह आशा माझ्या लागलीसे पाठी । काळ क्रूरदृष्टि पाहात असे॥ सांवता म्हणे देवा नका ठेवू येथे । उचलोनि अनाथा न्यावे मजा ४. सुखांत व दुःखांत देव ठेवील तसे रहावें. समयासी साँदर व्हावें । देव ठोविल तैसे रहावें ॥ कोणे दिवशी बसून हत्तीवर । कोणे दिवशी पालखी सुभेदार॥ १ श्रेष्ठ. २ राखरांगोळी. ३ दरिद्री. ४ तयार, तत्पर.