Jump to content

पान:संतवचनामृत.pdf/172

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४८ अनुभव. झाला सुखाचा शेजार । करा नामाचा गजर ॥ नामयाचा स्वामी आला । ब्रह्मादिकां आनंद झाला ॥ १४७. गरुडासमवेत सुदर्शनधारी देदीप्यमान देवाचे दर्शन. कोटिसूर्य प्रभादीप्ति । गगनीं झळकली अवचिती॥ संत नामया सांगती। पैल आला कमलापति ॥ वत्सालागी जैसी धेनु । तैसा धांवे जगज्जीवनु ॥ गरुडाचे धुंदुवाती । दाही दिशा आक्रंदती ॥ हरिकंठींची सुमनमाळा । सुटोनि आली भूमंडळा ॥ सवे चाले सुदर्शन । भक्त कराया रक्षण ॥ उचलोनि दोन्ही बाही। नामा धरिला हृदयीं ॥ १४८. महाप्रळयांत सप्तसागर एकवटतात तसा विश्वव्यापित्वाने .. स्वरूपसाक्षात्कार. चेइला तो जाणरे सद्गुरुववर्ती निर्धारें । विपरीत भावना विसर पडला कंठी जया परिहार रे॥ आपणा 4 पहावया कवण लावू दिवारे । चंद्रसूर्य जेणे प्रकाशे तो मी कैसा पाहूं येई रे॥ अंत त्यासी नाही रे स्थान मान कांही रे।। चेइला तेणे ओळखिला येरांसी अगम्य भाई रे ॥ पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर नाही दाही दिशा रे। महाप्रळई सप्त सागर एक होती अनुभविया तो तैसा रे॥ । १ संचार.