________________
१२६ - संतवचनामृत : नामदेव. [१३५ उपजतांचि फूल मोग-याच्या माथां । त्यासी परिमलता कोणे लावियेली ॥ कडू दुध्याच्या आळ्यांसी साखर दूध घातले । ते अधिकचि कहवाळे कवणे केले॥ गिळिला तोडिला खंडविखंडी। ऊस न संडी सोय गोडीसी ॥ नामा म्हणे तैसे आहे गा श्रीहरि । सोईचे व्यापारी घेईन तूंते ॥ ____ १३६. चरणांवर लोटांगण घालून मी तुझें रूप पाहीन. घालीन लोटांगण वंदीन चरण । डोळ्यांनी पाहनि रूप तुझे ॥ प्रेमें आलिंगीन आनंदे पूजीन । भावे ओवाळीन म्हणे नामा ॥ ___१३७. एकवेळ नयनी पाहून तुम्ही भलत्या गांवास गेला तरी हरकत नाही. 'एकवेळ नयनी पहावा । मग जाइजे भलत्या गांवा ॥ आठवाल वेळोवेळां । विठोबा आहे रे जवळां ॥ हृदयीं मांडूनिया ठसा । नामा म्हणे केशव असा ॥ ____१३८, मुक्याने गूळ खादला । गोडी न ये सांगायाला. गूळ गोड न लगे म्हणावां । तैसा देव न लगे वानावा ॥ सेवी तोचि चवी जाणे । येरां सांगतां लाजिरवाणे ॥ नामा म्हणे या खुणा। तुम्हीं ओळखा पंढरिराणा ॥ १३९. अमृतलिंग केशव चित्ती असल्याने आम्ही अखंड __ तृप्तीचा उपभोग घेत आहों. तान्हेलो भुकेलो । तुझेनि नामें निवालों॥ तहान नेणे भूक नेणे । अखंड पारणे नामी तुझ्या ॥ अमृतलिंग केशव हा चित्ती । तेणे नामया तृप्ति अखंडित ॥