Jump to content

पान:संतवचनामृत.pdf/165

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२२ संतवचनामृत: नामदेव. [$ १२८ - १२८. साधूची भेट होण्यास भाग्य लागते. रविरश्मि धरोनि स्वर्गी जाऊं येईल । परि साधुसंगतीचा पार नकळे नकळे ॥ वैतरणी उतरोनि वैकुंठा जाऊं येईल । परि साधुसंगतीचा पार नकळे नकळे॥ स्वमींचा हा ठेवा साचही होईल । परि साधुसंगतीचा पार नकळे नकळे ॥ मायबाप बंधु भगिनी मिळे योनि । परि साधूची मिळणी भाग्य योगें ॥ त व्रते दाने गोविंद पैं भेटे। परि साधु तंव न भेटे भाग्यविण ॥ नामा म्हणे केशवा बरा साधुसंग। यावेगळा भवरोगन तुटे न तुटे॥ १२९. ज्यास दया माया नाही असा हरिदास घेऊन काय _करावयाचा ? मुखी नाम हाती टाळी । दया नुपजे कोणे काळी ॥ काय करावे ते गाणे । धिक धिक् ते लाजिरवाणे ॥ हरिदास म्हणोनि हालवी मान । कवडीसाठी घेतो प्राण ॥ हरिदासाचे पायीं लोळे । केशी धरोनि कापी गळे ॥ नामा म्हणे अवघे चोर । हरिनाम है थोर ॥ १३०. कोणाचा अंकित न होईन अशी प्रतिज्ञा एका भक्तासच साजते. आणिक न मागे हे ब्रीद साजे चातका। भूमीच्या उदका न खालवी माथा ॥ १ परलोकांतील नदी. .