________________
११६ संतवचनामृत : नामदेव. [६१.४ काम क्रोध दोघे घातले बाहेरी। शांति क्षमा घरी राबवीत ॥ नामा म्हणे नाम गोविंदाचे वाचे। विसंबेनी त्याचे क्षणमात्र ॥ १०९. मानापमानयोस्तुल्यस्तुल्यो मित्रारिपक्षयोः । जैसा वृक्ष नेणे मान अपमान । तैसे ते सजन वर्तताती ॥ येऊनियां पूजा प्राणी जे करीती। त्याचे सुख चित्ती तयां नाहीं॥ अथवा कोणी प्राणी येऊनि तोडिती। तयां न म्हणती छेदं नका।। निंदास्तुति सम मानिती जे संत । पूर्ण धैर्यवंत साधु ऐसे ॥ नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी। तरी जीवा शिवा गांठी पडुनि जाय। .. ११०.. वैष्णवांच्या कुळींचा कुळधर्म.. आम्हां वैष्णवांचा कुळधर्म कुळींचा । विश्वास नामाचासर्वभावें॥ तरी त्याचे दास म्हणतांलाधिजे । निर्वासन कीजे चित्त आधीं॥ गाऊंनाचूं आम्ही आनंदें कीर्तनीं। भक्ति मुक्ति दोन्ही मागू देवा ॥ वृत्तिसहित मन बुडे प्रेमडोहीं। नाठवती देहीं देहभाव ॥ सगुणी निर्गुणी एकच आवडी । मने दिली बुडी चिदाकाशी ॥ नामा म्हणे देवा ऐसी मज सेवा । द्यावी जी केशवा जन्मोजन्मीं ॥ १११. खऱ्या भक्ताच्या योगानें तीन्ही लोक पावन होतात. निदील हे जन सुखे निदू द्यावें । सजनी क्षोभावे न ये बापा। निंदा स्तुति 'ज्याला समान पैं झाली। त्याची स्थिति आली PARAN समाधीला ॥ शत्रुमिन ज्याला समसमानत्वं । तोचि देवाते आवडला ॥ १ विसर पावणे. २ आनंद पावणे, -