Jump to content

पान:संतवचनामृत.pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०६ संतवचनामृत: नामदेव. [६८४ मधुमक्षियां मोहोळ रचितां रात्रंदिवसाभाग्यवंत रस घेउनि गेला शेळीस घातली उसांची वैरणी। घेऊं नेणे धणी त्या रसाची ॥ नामा म्हणे ऐसी चुकली बापुडीं। अमृत सेवितां पुढी चवी नेणे॥ ८५. सर्वेश्वरावर लक्ष ठेवून कोणताही व्यापार कर. वावेडी दुरीच्या दुरी उडतसे अंबरी। हाती असे दोरी परि लक्ष तेथे॥ दुडी वरि दुडी पाण्या निघाली गुजरी। चाले मोकळ्या करीं परि लक्ष तेथे ॥ व्यभिचारी नारी परपुरुष जिव्हारी। वर्ते घराचारी परि लक्ष तेथे ॥ तस्कर नगरी परद्रव्य जिव्हारी। वर्ते घरोघरी परि लक्ष तेथे ॥ धनलोभ्याने धन ठेवियेले दुरी । वर्ते चराचरी परि लक्ष तेथें ॥ नामा म्हणे असावे भलतियां व्यापारीं। लक्ष सर्वेश्वरी ठेऊनियां। ८६. कलियुगींच्या अधर्माचा महिमा. ऐका कलियुगींचा आचार । अधर्मपर झाले नर ॥ मंचकावरि बैसे राणी। माता वाहतसे पाणी ॥ स्त्रियेसी अलंकार भूषण । माता वळीतसे शेण ॥ स्त्रियेसी पाटावाची साडी । माता नेसे चिंध्या लुगडी॥ सासुसासां योग्य मान । मायबापां न घाली अन्न ॥ म्हणे विष्णुदास नामा। ऐसा कलियुगींचा महिमा ॥ ___८७. पोट माझी माता, पोट माझा पिता... वीतभर पोट लागलेसे पाठीं। साधुसंगे गोष्टी सांगू न देई ॥ पोट माझी माता पोट माझा पिता। पोटाने ही चिंता लाविलीसे॥ १ पतंग. २ कळशी व घागर यांची जोडी. ३ गुजराथी स्त्री. ४ अंतःकरणांत. ५ घरांतील धंदा. ६ चौर. ७ रेशमी उंची वस्त्र.