________________
संतवचनामृत : नामदेव. [६५५ शिवासी नामाचा आधार । केला कळिकाळ किंकर ॥ मरण झाले काशीपुरीं । तेथें नामचि उद्धारी ॥ अठरा पुराणांच्या पोटीं । नामाविण नाही गोष्टी ॥ नामा म्हणे अवघी चोरें । एक हरिनाम सोईरें ॥ ५६. नामावर श्रद्धा नसलेले वेदज्ञ, पंडित, व हरिदास घेऊन काय करावयाचे ? वेदपरायण मनी तो ब्राह्मण । चित्त समाधान संतुष्ट सदा॥ येरां माझं नमन सर्वसाधारण । ग्रंथाचे राखण म्हणोनियां ॥ शास्त्रपंडित तोचि मी बहु मानी। जो आपणांत जाणोनि तन्मय झाला ॥ पुराणिक ऐसा मानिता कृतार्थ । विषयी विरक्त विधि पाळी ॥ मानी तो हरिदास ज्या नामी विश्वास । मी त्याचा दास देहभावें॥ नामा म्हणे ऐसे कई भेटविसी विठ्ठला। त्यालागीं फुटला प्राण माझा ॥ ५७. पुंडलीकानें रचिलेल्या पेठेत नामद्राक्षांचे अपार घड आले आहेत. पुंडलिके रचिली पेठ । संत ग्राहिक चोखट ॥ प्रेमसांखरा वाटिती । नेघे त्यांचे तोडी माती ॥ १ दास. २ गि-हाईक, उमाण माझा ॥