________________
७८ संतवचनामृत : नामदेव, [६२० तूं माझी कुरंगी मी तुझे पाडस । गुंता भवपाश तोडी माझा ।। तूं माझी माउली मी तुझी तान्हुली। बोरसे वो घाली प्रेमपान्हा।। नामा म्हणे आस पुरवावी माझी । तान्हुलया पाजी प्रेमपान्हा॥ २१. मी चकोर, तूं चंद्र; मी सरिता, तूं सागर; मी याचक, तूं दाता आहेस. . - येई वो कृपावंते अनाथांचे नाथे। निवारी भवव्यथे पांडुरंगे ॥ मी बाळक भुकाळ तूं माउली कृपाल। करी माझा सांभाळु पंढरिनाथा ॥ माझे माहेर पैं नित्य आठवे अंतरीं। सखा विटेवरी पांडुरंग ॥ मी देह तूं चैतन्य मी क्षुधार्थी तूं अन्न । तृषार्थी तूं जीवन पांडुरंगा ॥ मी चकोर तूं चंद्र मी सरिता तूं सागर । मी याचक तूं दातार पांडुरंगा॥ मी धनलोभी शुद्ध तूं पूर्ण कनककुंभ। मी मगर तूं अंभ पांडुरंगा ॥ मी चातक तूं मेघ मी प्रवृत्ति तूं बोध । मी शुष्कनदी तूं ओघ पांडुरंगे ॥ मी दोषी तूं तारक मी भृत्य तूं नायक। मी प्रजा तूं पाळक पांडुरंगा ॥ मी पाडस तूं कुरंगिणी मी अंडज तूं पक्षिणी। - - १ हरिणी. २ स्नेहभरित पान्हा: ३ सोन्याचा घडा.४ पाणी. ५ सेवक.