Jump to content

पान:संतवचनामृत.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना अंतरी धरल्याने ( क्र. २७), व वैकुंठाचा पाठ चालविल्याने, त्यास : हरि हा धनदाट भरलेला दिसतं आहे (क्र. २८). ज्यांनी ज्यांनी रामकृष्णटाहो फोडला त्यांस वैकुंठभुवनांतले घर मिळाले आहे ( क्र. २९) भानुबिंबाप्रमाणे हे साधु 'निर्मळ व अलिप्त आहेत. (क्र. 3.) त्यांची भेट आज होणार असल्याने बाहेरच्या दोन भुजा, व आंतल्या दोन भुजांनी जणू काही चतुर्भुज होऊन मी . त्यांस अलिंगन देण्यास धांवत आहे (क्र. ३१). व्यासांच्या खुणेने ज्ञानेश्वर ‘सांगतात की, अशा भक्तांच्या घरी देव रावतो (क्र.३२ ). पूर्वजन्मांमध्ये मी फार मुरुते केली म्हणून आज संतदर्शन झाल्याने ती फळास आली असें मी समजतो; आज अंतःकरणांत परमानंद उत्पन्न होऊन अचेतनास प्राण मिळावा, वत्सास धेनु भेटावी, अगर कुरंगिणीस पाडस मिळावे, तसे झाले आहे (क्र. 33). श्रीगुरुसारिखे पाठिराखे असतां दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची काळजी करण्याचे कारण - नाही; ज्याप्रमाणे राजाच्या कांतेस भीक मागावी लागत नाही, अगर कल्पतरूच्या छायेखाली जो बसला त्यास कोणत्याही गोष्टीची उणीव पडत नाही, त्याप्रमाणे श्रीगुरूंनी सांभाळ केला असतां आपले सर्व मनोरथ पूर्ण होतात (क्र. ३५). ... ६. ज्ञानदेवांमध्ये वैराग्ययुक्त बोल फारसे दिसत नाहीत. नामदेवतुकारामांच्या अंतःकरणांत देवाच्या प्राप्तयर्थ ज्याप्रमाणे खळबळ उडून राहिली, अगर देवाची रुपा होण्याकरिता ज्याप्रमाणे रामदासांनी असंख्य करुणाष्टके केली, त्याप्रमाणे वैराग्ययुक्त बोल ज्ञानेश्वरांमध्ये फारच थोडे सांपडतात. ज्ञानेश्वरांस ईश्वरप्रीत्यर्थ 'फारच थोडे श्रम पडले असावे असे वाटते. त्यांच्या सर्व ग्रंथांत येथपासून तेथपर्यंत आनंदाची व अधिकाराची वाणी दिसते. ज्ञानेश्वरीत तर अंतःकरणाच्या तळमळीचे फारसे उद्गार दिसतच नाहीत. ज्ञानेश्वरांच्या अभंगांत मात्र चार दोन ठिकाणी असे वैराग्याचे बोल आहेत, त्यांचा जिज्ञासूंनी अवश्य अभ्यास करावा. क्रमांक ३७ मध्ये देव जवळ असून त्याची भेट होत नाही याबद्दल ज्ञानेश्वर दिलगिरी प्रगट करितात. क्रमांक ३८ मध्ये आपल्या अंगावरचे घोंगडें फाटले असल्याने आपल्यास धडौता करण्याविषयी त्यांनी देवास विनंति केली आहे; माझें घोंगडे फाटले असल्याने मला दुसरें घोंगडे केव्हां प्राप्त होईल याबद्दल मला रात्रंदिवस चिंता वाटत आहे, असे ज्ञानेश्वर म्हणतात; नवीन घोंगडे घेण्यास जवळ वित्त नाहीं; उघड्या पाठीवर हीच वाजत असल्याने देवास घोंगडे देण्याबद्दल त्यांनी प्रार्थना केली आहे. क्रमांक ३९ मध्ये जिचा भ्रतार परदेशास गेला आहे,