Jump to content

पान:संतवचनामृत.pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३] नामदेवांच्या अंतःकरणांतील तळमळ. ७५ २. नामदेवांच्या अंतःकरणांतील तळमळ. ... ११. सुवासावर भ्रमर, अगर मधावर माशी, याप्रमाणे देवावर माझे चित्त आहे. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केलें । तेव्हां या विठ्ठले कृपा केली॥ जन्मोनि संसारी झाली त्याचा दास।माझा तो विश्वास पांडुरंगी। अनेक दैवतां नेघे माझे चित्त । गोड गातां गीत विठोबाचें ॥ भ्रमर सुवासी मधावरी माशी । तैसें या देवासी माझे मन ॥ नामा म्हणे मज पंढरीस न्यारे । हर्डसोनि द्यारे विठोबासी॥ ____१२. माझे मनोरथ तुवांजचून कोण पुरविणार ? माझे मनोरथ पूर्ण कीजे देवा। केशवा माधवा नारायणा ॥ नाहीं नाहीं मज आणिक सोयरा। न करी अव्हेरा पांडुरंगा ॥ अनाथाचा नाथ होसी तूं दयाळा। किती वेळोवेळां प्राथू आतां॥ नामा म्हणे जीव होतो कासाविस । केली तुझी आस आतां बरी॥ १३. मी अनाथानाथ असलो तर तूं अनाथनाथ आहेस. अनाथ अनाथ म्हणती मातें । अनाथनाथ म्हणती तूतें ॥ आपुले ब्रीद साच करी। भेट मज एक वेळ मुरारी॥ पतित पतित म्हणती माते । पतितपावन म्हणती तूतें ॥ . दीन दीन म्हणती माते । दीननाथ म्हणती तूते ॥ _____ १ भुंगा. २ बजावणे, ३ अनाथांचा वाली. - - - -