________________
नामदेवचरित्र. देवाने गोधळ घातला गरुडपारी । भिजली पितांबरी अश्रुपातीं। माझे माझे म्हणोनि गाइले गा-हाणे कळले संतपण हेंचि तुमचें। भरी भरोनियां आलो तुमचे जवळीं। कैकार्ड मंडळी ठावी नोहे ॥ नामा म्हणे सन्मान पावलो भरून । करितां गमन भले दिसे ॥ ७, नामदेव इंद्रायणीच्या पार जाऊन त्वरेने पंढरपुरास जातो. न पुसतां संतां निघाला तेथुनि। पैलपार इंद्रायणी प्राप्त झाला ॥ मागे पुढे पाहे पळतो तांतडी । आला उडाउडी पंढरीसी ॥ कवळोनि कंठी विठ्ठल हे मूर्ति । नको देऊ हाती निवृत्तीच्या ॥ ज्ञानदेव सोपान पाठविले कोरे । जुनाट म्हातारा जाळू आला ॥ मुक्ताबाईने तेथे माजविली कळी । हे संतमंडळी कपटी तुझी ॥ नामा म्हणे देवा आणिलो पूर्वदैवें । गेलो असतो जिवे सगळाचि ॥ ८. पंढरपुराहून विसोबा खेचराच्या दर्शनास प्रयाण. देवावरी पाय ठेवूनि खेचर । निजेला परिकर निवांतचि ॥ देखोनियां नामा पावला विस्मया । कैसा हा प्राणिया देवो नेणे ॥ उठीं उठी प्राण्या आंधळा तूं काय । देवावरी पाय ठेवियेले ॥ विसोबा खेचर बोले नामदेवा । उठविले जीवा कां रे माझ्या ॥ देवावीण ठाव रिता कोठे आहे । विचारोनि पाहे नामदेवा ॥ जेथे देव नसे तेथे माझे पाय । ठेवीं पां अन्वर्य विचारूनी ॥ नामा पाहे जिकडे तिकडे देव । कोठे रिता ठाव न देखेचि ॥ ९. दगडाच्या मूर्तीमुळे जर इच्छा पुरेल तर ती आघाताने का भंगते? पाषाणाचा देव बोलेचि ना कधी । हरी भवव्याधि केविं घडे ॥ दगडाची मूर्ति मानिला ईश्वर । परि तो साचार देव भिन्न ॥ १ टोपल्या वगैरे विणणारी एक जात. २ घाईनें. ३ आलिंगन देणे. ४ तंटा. ५ समर्थ, तयार. ६ संगति. ७ दूर करणे.