________________
सोपानदेव. १. हरीचें ध्यान करणारे नाना योनिरूप आपदा पावत नाहीत. मनाचे मवाळ हरिरूप चिंतिती । रामकृष्णमूर्ति नित्यकथा॥ रामकृष्णध्यान सदा पैं सर्वदा। न पवेल आपदा नाना योनी ॥ हरिध्यान जप मुक्त मैं अनंत । जीव शिवीं रत सर्वकाळ ॥ सोपान प्रेमा आनंद हरीचा । तुटला मोहाचा मोहपाश ॥ २. सर्व काही सोवळे आहे; अभक्तांचे मनच फक्त ओवळे होय. पृथ्वी सोवळी आकाश सोवळे । मन हे वोवळे अभक्तांचे ॥ ब्रह्म है सोवळ न देखो वोवळ । असो खेळमेळे इये जनीं॥ ब्रह्मांड पंढरी सोवळी हे खरी । तरसी निर्धारी एक्या नामे ॥ सोपान अखंड सोवळा प्रचंड । न बोले वितंड हरिविण ॥ ३. नाम हेंच परब्रह्म आहे. आवडीचे मागे प्रवृत्तीचे नेघे । नाममार्गे वेळगे निघे रया ॥ नाम परब्रह्म नाम परब्रह्म । नित्य रामनाम जपिजेसु ॥ अंतरींच्या सुखे बाहिरिलीया वैखें । परब्रह्म सुखे जपतुसे ॥ सोपान निवांत रामनाम मुखांत । नेणे दुजी मात हरीविण ॥ १ मृदु. २ कष्ट, त्रास. ३ जन्म. ४ बडबड, वितंडा. ५ चाल, जा. ६ वेषाने.