Jump to content

पान:संतति नियमन शास्र आणि पद्धति.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सोन्याची कुऱ्हाड

५३

ऋतुस्नानः - स्त्रियांस दर महिन्यास जें ऋतुस्नान घडतें त्याचाही खरा अर्थ काय तो समजून घेतला पाहिजे. स्त्रीच्या प्रत्येक सूक्ष्मांडा- भोवती एक प्रकारचें आवरण किंवा वेष्टण असतें. स्त्री वयांत येऊन तिला ऋतुस्नान घडूं लागण्यापूर्वी हें वेष्टण अभंग असतें. परंतु स्त्री वयांत आली म्हणजे प्रतिमासीं तिच्या अंडाशयांत एक प्रकारचा विलक्षण क्षोभ व्हावयास लागतो. ही प्रक्षुब्ध अवस्थ महिन्याच्या महिन्याला होऊं लागते, व हिच्या मुळाशी दोन गोष्टी असतात. एक ऋतुस्राव आणि दुसरें सूक्ष्मांडपरिपाक. या दोन क्रिया एकाच वेळी घडतात खऱ्या, पण त्या तशा कां घडाव्या हें अजून समजलेलें नाहीं. मात्र त्यांचा परस्पर कार्यकारण संबंध नाहीं अशी शास्त्रज्ञांची समजूत आहे. एक सूक्ष्मांड परिपक्क होऊन तें अंडाशयांतून बाहेर टाकले जाणे या क्रियेला सूक्ष्मांड परिपा ( Ovulation ) असें नांव आहे. स्त्रीच्या प्रथमार्तवापासून ही क्रिया घडत असते, म्हणजे अंडाशयांत क्षोभ सुरू होऊन एक सूक्ष्मांड आपल्या भोवतालचें आवरण फोडून बाहेर पडतें आणि अंडाशयां- तून स्थानभ्रष्ट होतें. ऋतुस्रावाची क्रिया याहून अगदी भिन्न आहे. तो एक प्रतिमासिक रक्ताचा स्राव आहे असें म्हणावयास हरकत नाहीं. हा स्रावही दर अठ्ठावीस दिवसांनींच व ज्या वेळीं सूक्ष्मांड - परिपाकाची क्रिया घडते त्याच वेळीं होत असतो. या दोन्ही क्रियां- चा कार्यकारण संबंध नसला तरी त्या नेहमी एकाच वेळी घडतात हें मात्र लक्षांत ठेवण्यासारखें आहे.
 ज्या रक्ताच्या स्रावाला ऋतुस्राव म्हणतात तें रक्त गर्भाशयाच्या आंतील भागांतून येतें. दर महिन्याला ऋतुस्राव सुरू व्हावयाच्या आधीं कांहीं दिवस गर्भाशयाच्या अंतर्भागांत बरेंच रक्त सांचतें व त्या रक्ताच्या दडपणानें तो ताणला जातो. गर्भाशयांत गर्भ राहिलेला असेल तर त्या गर्भाचें पोषण करण्याकडे या रक्ताचा व्यय होतो.