पान:संतति नियमन शास्र आणि पद्धति.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
संततिनियमनासाठीं ब्रह्मचर्य

३९

मालयस स्वस्थ राहिला नाहीं, तर त्यानें सर्व लोकांस अल्पप्रस- वितेचें धोरण स्वीकारण्याचा उपदेशही कंठरवानें केला. मालथसच्या वेळेपासूनच लोकसंख्येच्या प्रश्नाकडे लोकांचें लक्ष वेधलें गेलें हेंही आम्ही पूर्वी एकदा वाचकांस सांगितलेच आहे. अर्थात् ज्या माल- यसनें अल्पप्रसवितेच्या उपदेशाचा उपक्रम प्रथम केला त्याची त्या- बद्दलच्या साधनांविषयीं काय कल्पना होती तें पाहणें अगत्याचें आहे. अल्पप्रसवितेसाठी लोकांनी कोणता उपाय करावा असें माल- थसचें म्हणणें होतें ? या प्रश्नाचा विचार करण्यासारखा आहे. मालथसचा स्वतःचा उपदेश पाहिला तर तो असा होता, कीं स्त्री- पुरुषांनीं संभोग सौख्यच अतिशय नियमितपणे घ्यावें म्हणजे प्रजोत्पत्तीचे प्रमाण आपोआपच कमी होईल. संभोग व संतति यांचा अबाधित कार्यकारण संबंध असल्याचे पाहून संततिनियमनासाठीं संभोगनियमनाचा मार्गच त्यानें लोकांस सुचविला. पतिपत्नींस संभोगसुखाची लालसा असणें साहजिक आहे, परंतु त्या सुखाबरोबर एक प्रकारची सामाजिक जबाबदारी आपल्यावर येते हे त्यांनी विसरता कामा नये व ती जबाबदारी योग्य रीतीने पार पाडण्यासाठी त्यांनीं बऱ्याच प्रमाणांत ब्रह्मचर्यव्रतानें राहिलें पाहिजे, असा मालथसचा सर्वांस उपदेश होता.
 आपल्या प्राचीन आर्याच्या कल्पना पाहिल्या तरी त्या याच स्वरूपाच्या होत्या असे आढळून येतें. सुप्रजाजननाचे महत्त्व आमच्या स्मृतिकारांस माहीत होतें, हें सहज साधार सिद्ध करण्यासारखे आहे. तेव्हां स्त्री-पुरुषसंबंध कशा प्रकारचा असावा याविषयीं स्मृति- कारांचें सांगणें काय होतें तें पाहणें बोधप्रद होईल. अल्पप्रसवितेच्या ध्येयाची कल्पना त्या काळी लोकांच्या मनांत यावयाचें कारणच नव्हतें. परंतु सुप्रजाजननाच्या दृष्टीनें ब्रह्मचर्याचें महत्त्व फार असल्या- चें मात्र स्मृतिकारांनी जाणलें होतें व त्याचा उपदेशही त्यांनी