पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०६ श्रीमद्भगवद्गीता. ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम् । ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्मकर्मसमाधिना ।। २४ ॥ म्हणजे साक्षात् तेच यज्ञ कायम ठेविले पाहिजेत असे म्हटले आहे. पण भगवान आतां असें सांगतात की. यज्ञ म्हणजे केवळ देवतोदेशार्ने अग्नीत तीळतांदूळ किंवा पशु यांचे हवन करणें, अगर चातुर्वण्र्याची कम स्वधर्माप्रमाणे पण काम्य बुद्धीने करणे, एवढाच संकुचित अर्थ समजू नका. अग्नत आहुति टाकितांना अखेरीस 'इदं न मम' हे माझे नव्हे-असे जे शब्द उच्चारितात त्यांतील स्वार्थ- त्यागरूप निर्ममत्वाचे जे तत्व तोच चज्ञांतील प्रधान भाग होय; आणि अशा रीतीने "न मम" म्हणजे ममबबुद्धि सोडन ब्रह्मार्पणर्वक आयु- प्यांतील सर्व व्यवहार करणे हाहि एक मोठा यज्ञ किंवा होमच होत असून, या यज्ञाने सर्व देवतांची देवता जो परमेश्वर किंवा ब्रह्मा त्याचे यजन घटत असते. अर्थत् मीमांसकांचे द्रव्ययज्ञाबद्दल जे सिद्धान्त आहेत ते या बड्या यज्ञासहि लागू पडून, आसक्तिविरहित जगांतील कमें लोकसंग्रहार्थ करणारा पुरुष कर्माच्या 'समग्र' फलापासून मुक्त होत्साता अखेर मोक्ष पावतो. (गीतार.प्र.११५.३४२-३१५ पहा). हा ब्रह्मार्पणरूपी बड़ा यज्ञच पुढील श्लोकांत प्रथम वर्णिला आहे आणि नंतर त्यापेक्षा कमी योग्यतेच्या अनेक लाक्षणिक यज्ञांचे स्वरूप सांगून, पुनः अशा प्रकारचा ज्ञानयज्ञच सोत श्रेष्ठ', असा एकंदर प्रकरणाचा ३३ व्या श्लोकांत उपसंहार केला आहे.] (२४) अर्पण ह्मणजे हवन करण्याची क्रिया ब्रह्म, हवि म्हणजे अर्पण करावयाचे द्रव्य ब्रह्म, ब्रह्मानित ब्रह्माने हवन केले; (सर्वच) कर्म (याप्रमाणे) ब्रह्म अशी ज्याची बुद्धि झाली त्याला ब्रह्मच मिळावयाचे. अर्पण' या शब्दाचा अर्थ "अर्पण करण्याचे साधन म्हणने पळी इत्यादि " असा शांकर भाष्यांत केला आहे. पण तो जरा क्लिष्ट आहे.