पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/106

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जाग!


माणूस जेव्हा जागा होतो तेव्हा गवत कापण्याची मजुरी रोज चार आण्यांवरून दोन रुपयांवर जाते.

सावकाराची मारहाण थांबते. मालकाचे न ऐकणाऱ्या एखाद्या नाठाळ मजुराला कोळशाच्या जळत्या भट्टीत ढकलून जिवंत जाळण्याचे राक्षसी अत्याचार थांबतात. माणूस जेव्हा जागा होतो तेव्हा वारल्यांच्या मुलीबाळी, स्त्रिया ही आपलीच मालमत्ता समजण्याचे धाडस सावकार करेनासा होतो.

जेमतेम कमरेला फडके गुंडाळणारा आदिवासी शर्ट-पँटीत दिसू लागतो. स्त्रियाही साडी बरोबर चोळी-काचोळी वापरू लागतात.

क्वचित एखाद्या झोपडीत घड्याळ दिसते.

ठाणे जिल्ह्यातील डहाणू-तळासरी या वारली आदिवासी भागात माणसाला आलेली ही जाग तेथे जाऊनच पाहण्यासारखी आहे. 'आज आम्ही येथे काही राष्ट्रसेवेचे काम करतो. काही ठिकाणी रस्ते झालेले आहेत. वाहने, एस. टी. येऊ-जाऊ शकतात. पण पंचवीस वर्षांपूर्वी पायी हिंडणेदेखील मुश्कील होते. त्या काळात गोदाराणी येथे आली, वारल्यांना तिने जागे केले, अन्यायाविरूद्ध बंड पुकारले. ही कामगिरी अलौकिक होती. अद्यापही तिच्या लाल बावट्याचा प्रभाव येथे जबरदस्त आहे. लाल महालच म्हणतात या भागाला'–एका हिंदुत्ववादी कार्यकर्त्याचे हे विचार पहिल्या दिवशीच्या मुक्कामातच मला ऐकायला मिळाले. आचार्य भिसे, नारगोळकर पतिपत्नी या सर्वोदयी सेवकांचे परिश्रमही खूप आहेत. परंतु अन्यायाविरूद्ध झगडा देऊन माणुसकीच्या प्राथमिक हक्कांचे माप आदिवासी वारली समाजाच्या पदरात टाकणेऱ्या महत्कृत्यातील सिंहाचा वाटा लाल बावट्याकडे जातोत्यातल्या त्यात शामराव व गोदावरी परुळेकर पतिपत्नींकडे-हे कट्टर विरोधकही नाकारू शकत नाहीत.

हा भाग पाहण्याची ओढ तशी कॉलेजमध्ये असल्यापासून होती. डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांच्या अभ्यास-मंडळाच्या बैठकीत हा विषय एकदा डॉक्टरांनी निवडला होता. त्या

। ९९ ।