Jump to content

पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/6

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

साधन बनून पुढे येते. मर्यादांसह ते मराठी साहित्याचा अनमोल ठेवा बनते. हे चरित्र खांडेकरांच्या अशा आकलनाचे व्यक्तिपरिचायक व साहित्य मूल्यांकनाचे माध्यम बनावे म्हणून केलेला हा खटाटोप. वाचकांची खांडेकरांविषयीची आजवरची समज विस्तारत सखोलपणे त्यांच्या जीवन, साहित्य, विचार आस्वादास हे चरित्र प्रेरणा देईल, अशी मला आशा आहे.

डॉ. सुनीलकुमार लवटे

११ जून, २०१७
साने गुरुजी स्मृतिदिन