Jump to content

पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/93

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्वतंत्र अस्तित्व निर्माण करतो. त्यासाठी स्वातंत्र्य गरजेचे असते. स्वातंत्र्य त्याचा जन्मसिद्ध अधिकार असतो. ते द्यायची गोष्ट नसून मिळवायची गोष्ट होय. निवडीचे स्वातंत्र्य जबाबदारी घेऊन जन्मते. त्यामुळे निर्णय, कृतीची जबाबदारी ज्याची त्याची असते. जगात ना ईश्वर आहे, ना नियती. आहे ती फक्त कृती व जबाबदारी. माणूस आपल्या जगण्याला अर्थ निर्माण करेल तर त्याचे जीवन सार्थकी लागले समजायचे.

◼◼

वाचावे असे काही/९२