Jump to content

पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/138

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यातील डाळ, शेंगदाणे, मनुके, खोब-याचे तुकडे वेचून खाणार्‍या छंदासारखाच हा छंदही. तो आनंद पुढच्या दिवाळीपर्यंत टिकतो हा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव. दिवाळी अंक वार्षिक असल्याने वर्षभर पुरवून पुरवून वाचायचे असतात, ते नवी दिवाळी येण्यापर्यंत. दिवाळीत दिव्याने दुसरा दिवा पेटवतो तसे एका अंकाने दुस-या दिवाळी अंकाचा दुवा जोडत राहायचा तो 'घेतला वसा टाकू नये' न्यायाने.

◼◼

वाचावे असे काही/१३७