पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/178

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आमचे आधुनिक विद्वान् अकालीं कां मरतात ? १६३ केोणतेंच निश्चयात्मक अनुमान बसविता येत नाही. बाकी दक्षिणी, गुजराथी, आणि पार्शी राहिले; यांची संख्या १९७२ आहे. पैकीं एम्. ए., बी. ए. वगैरे कोणकोणत्या ज्ञातींत किती किती आहेत, व त्यापैकीं अकालीं मेलेले किती हें दुसरीकडे दिलेल्या दोन कोष्टकांवरून दिसून येईल, पाशीं लोक दक्षिणी किंवा गुजराथ्यांपेक्षां एम्. ए.च्या किंवा एलू. एम्. एस्.च्या परीक्षेस जास्त जातात असें यावरून आढळून येतें; व ते मुंबईचेच स्थायिक राहणारे असतात यामुळे असें होणें अगदी साहजिक आहे. आता अकालीं मयत झालेल्या लोकांची संख्या व प्रमाण पाहतां असे आढळून येईल. कीं, एल्. सी. ई. सर्वात कमी मरतात त्यापेक्षा बी. ए. झालेल्या लोकांत मरण्याचे प्रमाण ( शकडा ७) जास्त आहे. नंतर वाढत्या प्रमाणानें एल. एम्. एस्. एलूएल्. बी., आणि एम्. ए. ही पदवीवाले येतात; व सर्वात एम्. ए. एलूएलू, बी. जास्त म्हणजे २४ पैकी ९ अथवा शेकडा ३३ या मानानें मेले आहेत असें आढळून येतें. हा सामान्य विचार झाला. जातीसंबंधाने पाहतां असें आढळून येतें की, मृत्यूचे प्रमाण पाशांमध्यें शेंकडा ४१ गुजराथ्यामध्यें शंकडा ५ व दक्षिणीमध्ये शेकडा १० असे आहे. म्हणजे दक्षिणी लेोकांमध्ये मृत्यूचे प्रमाण सर्वाहून जास्त आहे. व पाशी आणि गुजराथी या दोहोंमध्ये यासंबंधानें फारसें अंतर नाही असें आकडयावरून सिद्ध होते. दक्षिणी लोकांपैकीं, डॉक्टरांत मृत्यूचें मान शैकडा १९, एम्. ए. झालेल्यात शैकडा २४, नुसत्या बी. ए. झालेल्या लोकात शेकडा ९, आणि एलूएलू. बी झालेल्यात शेकडा ८। आहे असें दुसरीकडे दिलेल्या काष्टकावरून दिसून येईल, भगवान दास-पुरुषोत्तमदास-स्कालरशिप म्हणून संस्कृतात एम्. ए.च्या परीक्षेत जो पहिला येईल. त्यास बक्षीस देण्यात येत असते. हें बक्षीस ज्यानीं आजपर्यंत मिळविलें आहे. अशा १५ गृहस्थापैकीं १० मयत आहेत, व यातच कै०वा० आपटे, वैद्य, गोखले, भिडे, आठल्थे याचा समावेश होतो. आकडयांवरून व कोष्टकावरून जे ठळक ठळक सिद्धान्त निघतात तें वर लिहिल्याप्रमाणे आहेत. आता याची कारणे काय असावीत याचा विचार करूं. डॉ० भांडारकर यानी असे म्हटलें होतें कीं, दक्षिणी लोकात मृत्यूचे जें अधिक प्रमाण आढळून येतें त्याचीं मुख्य कारणें कदन्न, बालविवाह, आणि व्यायामविद्वेष ही होत. पाशीं लोक अधिक चांगलें अन्न खातात, अधिक व्यायाम घेतात व उशीरां लग्न करतात, तेव्हां ते अर्थातच दक्षिणी लोकापेक्षा अधिक जगतात असें डॅॉक्टरसाहेबाचे म्हणणे होतें. हें म्हणणे आपणास कबूल नसल्याबद्दल आम्ही त्याच वेळीं लिहिले होतें; व हल्लीं रा. ब. रानडे यानी या विषयाचे जें शोधकबुद्धीनें परीक्षण केले आहे यावरूनही आमचेच म्हणणें खरें ठरते, डॅॉक्टरसाहेबाचे