पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६0 लो. टिळकांचे केसरींतील लेख

अधिविन्ना तु भर्तव्या महदेनो न्यथा भवेत् |

कारण -

यत्रानुकूल्यं दंपत्यो: त्रिवर्गस्तत्र वर्धते |

असे याज्ञवल्क्यस्मृतींत सांगितले आहे. 'भर्तव्या' याची "नावमान्या" या मनुवचनास अनुसरून "दानमानसत्कारैर्भर्तव्या" अशी विज्ञानेश्वरानीं व्याख्या केली आहे. त्रिवर्ग म्हणजे धर्मार्थकाम, पूर्वोक्त कारणावांचून जर नवरा बायको सोडून देईल तर नारदानें:--

अनुकूलामवाग्दुष्टां दक्षा साध्वीं पतिव्रता
त्यजन् भार्यां अवस्थाप्यो राज्ञा दंडेन वै पति: |

त्यास राजाने दंड करून ताळ्यावर आणावे अशी शिक्षा सांगितली आहे. याज्ञवल्क्यानेंही:--

आज्ञा संपादिनीं दक्षा वीरसूं प्रियवादिनीम्
त्यजन् दाप्यस्त्रितीयाशो द्रव्यो भरणं स्त्रिय: |

जर तो ऐकत नसेल तर बायकोस त्याच्या मिळकतीचा तिसरा हिस्सा किंवा तो दरिद्री असल्यास निदान अन्नवस्त्र तरी द्यावें अशी व्यवस्था सागितली आहे. आता रा.ब. च्या अपूर्व युक्तिक्रमाचे आविष्करण करण्यापूर्वी वाचकांस एवढें पुन: सागितले पाहिजे कीं, हा जो अधिवेदनाचा अधिकार शास्त्रात सांगितला आहे तो फक्त पुरुषासच आहे. नवरा दारूबाज वगैरे असल्यास स्त्रियेनें त्यास टाकावें किंवा दुसरा विवाह करावा असें कोणीही सांगितले नाही. असल्यास रा.ब.नीं तें अवश्य दाखववें. उलट:--

अतिक्रामेत् प्रमत्तं या मत्तं रोगार्तमेव वा
सा त्रीन् मासान् परित्याज्या विभूषणपरिच्छदा |

अशा जुगारी, दारूबाज, किंवा रोगी नव-यास टाकणा-या स्त्रीस मनूनें शिक्षा सागितली आहे. स्त्रीने दुसरा विवाह केव्हां करावा यास "नष्टे मृते प्रव्रजिते" इ. एकच वचन आहे. पण येथें त्याचा संबंध नसल्यामुळे आम्ही आज त्याच्या अर्थाच्या भानगडींत पडत नाहीं. आपणांपुढें प्रश्न एवढाच आहे कीं, ज्याप्रमाणें "सुरापी" इ कारणांकरिता पुरूषास पहिली बायको असतां दुसरा विवाह करता येतो, (पहिली बायको त्यास सोडतां येत नाहीं हो !)त्याप्रमाणे विवाहाचा राहूं द्या, पण नवरा "दारूबाज" वगैरे असल्यास सोडण्याचा तरी हक्क स्त्रीस येतो कीं नाहीं? आम्ही रा.ब.स असे स्पष्ट कळवितों कीं, असा हक्क स्त्रीस कोणत्याही गंथात दिला नाही. मग आमच्या शास्त्रकारांस हवें तें म्हणा ! फक्त नवरा जर पतित, नपुंसक, कुष्टादिपापरोगानीं पीडित किंवा धोंडे मारण्यासराखा वेडा असेल तर मात्र स्त्रीनें त्याचा त्याग केल्यास कांही दोष नाहीं; असें:--