Jump to content

पान:लेक लाडकी (Lek Ladaki).pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

समाजात आणि कुटुंबात आपली मुलगी सुरक्षित राहू शकते याची खात्री नाही तिथे मुलगी जन्माला घालाच कशाला, हा विचार बळावतो. प्रश्न ३- गर्भलिंग निदानाचे काय गंभीर परिणाम होतील? निसर्गाचे सुक्ष्म संतुलन आणि समाजाचा नैतिक ताणाबाणा बिघडू शकतो. देशातील काही भागांमध्ये आत्ताच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की त्या ठिकाणी गेल्या १०-१५ वर्षात मुली जन्मलेल्याच नाहीत. मुलींचा व्यापार, लैंगिक शोषण वाढेल, नव्हे ते वाढतच आहे. गरिबी असलेल्या प्रदेशातील मुली चक्क गुराढोरांसारख्या विकत आणल्या आहेत. मुली म्हणजे जणू काही क्रयवस्तू आहे. त्या ठिकाणी मुलींचे स्थान आणखी दयनीय व निकृष्ट झाले आहे. स्त्रियांवरील अत्याचार आणि हिंसाचार यात वाढ होईल. बहुपतीत्वाच्या प्रथा मुलींवर लादल्या जातील. गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्रातील जळगांव सारख्या जिल्ह्यांमध्ये काही विशिष्ट समाजामध्ये लग्नासाठी मुलीच मिळत नसल्यामुळे दुस-या प्रदेशातून मुलींची फसवणूक करून किंवा मुलीच्या बाबाला पैसे देवून मुली आणल्या जातात. | | । । गल्या जातात. ...७...