Jump to content

पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कमी भार पडावा म्हणून अहोरात्र राबणं, रानात कामाला जाणं व उपासाच्या नावाखाली एकदाच दुपारी भाकरतुकडा खाणं, त्यामुळे ठकूबाई कमालीची रोडावलेली होती. तिला हे खडी फोडण्याचं काम झेपणारं नव्हतं. पहिल्या आठवड्यानंतर जेव्हा रोजगाराचं वाटप झालं, तेव्हा तिची मजुरी तिच्या भावजयींपेक्षा अर्धीच भरली होती, वयनी, काय करू बघा. कपाळीचं कुंकू गेल्यानंतर कुडीत जीवच नाय राहिला....."
 गावातल्या व समाजातल्या बायका राघूची बायको मैनाचे कान फुकत असल्या तरी, जात्याच प्रेमळ असल्यामुळे तिला ठकूबाईकडे पाहिलं की पोटात कसंतरीच व्हायचं. आपल्याच उमरीची ही आपली नणंद, कुंकवाचा आधार गेला आणि बिचारीची जिंदगी बर्बाद झाली. समाजात पुन्हा विवाह होत असे पण तिची खचलेली कुडी व गेलेली रया पाहून कोणी तयार होत नव्हता. दोन मौसम प्रयत्न केल्यानंतर, राघूनं अलीकडे नाद सोडून दिला होता. बहिणीला माहेरी जन्मभर पोसावं एवढी काही त्याची ताकद नव्हती, तरीही तो व मैना जमेल तेवढं व तसे तिला सांभाळीत होते. पण तीही आपल्यापरीनं भार होऊ नये यासाठी कामाची पराकाष्ठा करायची.
 हे कठीण काम तिला झेपणार नाही, हे राघू व मैनेला पण ठकूबाईप्रमाणे समजत होतं. तिची मजुरी पण फार कमी पडत होती. तरीही ते चूप होते. कारण तेवढीच मजुरी प्रपंचाला मिळत होती व मुख्य म्हणजे मंजुरी कितीही असली तरी दररोज एक किलो गव्हाचे कुपन मिळत होते. त्यामुळे त्यांच्याकडे आता दोन क्विंटल गव्हाएवढे कुपन साचले होते. ते वटवून गह घ्यायचा व तो बाजारात विकून पैका करायचा राघूचा बेत होता. कारण घरी गह परवडणार नव्हता. व त्याला परत तेल लागणार होतं.... ते त्यांना शक्यच नव्हतं.
 जोडरस्ता अवघ्या दीड किलोमीटरचा असल्यामुळे ते काम तीन आठवड्यात सपलं, तेव्हा राघू तिघांचे कुपन एकत्र करून शेजारच्या गावात बोरसला गेला, पण त दुकान मागच्याच आठवड्यात धान्याचा काळाबाजार केला असता तहसीलदारांनी रंगेहाथ पकडून निलंबित केलं होतं व ते गाव काळगावच्याच दुकानाला जोडलं होत.
 सारा दिवस व चक्कर वाया गेली होती, पण राघूला त्याचं फारसं काही वाटलं नव्हतं. कारण खेडेगावात रेशन दुकानं कधीच नीट चालत नाहीत, जावं तेव्हा उघडी " तर धान्य कधी असतं, कधी नसतं; त्यामळे आपल्या हक्काचंही धान्य नीटपणे वळच्या वेळी मिळणं अवघडच होतं. हे सारं राघुला माहीत होतं. म्हणून तो निमूटपणे परत आला.

 पण काळगावच्या रेशन दुकानाला कुलूप पाहिल्यावर मात्र त्याचा धीर खचला. घरातलं सारं धान्य व पैसा संपला होत, अक्षरशः दोन वेळा पोटात घासही जात नव्हता. रानात कुठेच काही काम नव्हतं. तेव्हा जाणकार ठकूबाईनं डोंगरमाथा हुडकून कसला तरी पाला तोडून आणला होता व दोन दिवस त्यावरच ते कुटुंब पोट भरत

लक्षदीप । ७५