पान:लंकादर्शनम्.pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०८

जातें, कारागिरांची वस्त्रे विणण्याची व दागिने करण्याची हत्यारे सुध्दां (ज्या वेळीं कॅंडीचे राजे येथे राज्य करित होते त्यावेळची म्हणजे सुमारे ७|८ शतकांतलीं ) पूर्वीच्या पध्दतीची आहेत. यामुळे पूर्वीची कारागिरी कशी होती, काम कसे केले जात असे ते येथे प्रत्यक्ष पहावयास सांपडते व जुन्या सीलोनी पध्दतीचे पदार्थही खरेदी करितां येतात.

 सध्यांच्या सरकारी कचेरी समोर पूर्वीचा सभामंडप आहे. कॅंडीच्या प्राचीन शिल्पशास्त्राचा नमुना म्हणून ही इमारत प्रसिध्द आहे. कॅंडीच्या जुन्या राजवाड्यांत सांप्रत सरकारी आफिस आहे. सध्या जेथे कॅंडीच्या न्यायाधिशाची बसण्याची जागा आहे तिच्या समोरच्या बाजूस पूर्वी राजाचे सिंहासन होतं.

कॅंडीच्या भोवतालची देवळे.

 कॅंडीपासून जवळच तेथील राण्यांनी बांधलेली 'नटदेवळ' 'महादेवळ' 'कटरागमदेवळ' व 'पटनी देवळ' या नांवांची प्रसिध्द देवळे आहेत. ही द्राविडी पध्दतीची असून तेथील नक्षीकाम पहाण्यासारखें आहे. कांहीं कांहीं मूर्तिमध्ये अनेक रत्ने आहेत.

 तेथील देवळांत एक सोन्याचे पिंपळाचे झाड बनविलेले आहे व त्याची पाने खऱ्या पांचूची बनविलेली आहेत. हा पिंपळाचा वृक्ष पाहिल्यावर प्राचीन काळीं हिंदुस्थानांतील देवळांतून किती संपात्ति असेल याची कल्पना येते. देवळांतून ही जी संपात्ति असे ती नेण्याकरितांच प्रथमतः हिंदुस्थानावर परकीयांच्या स्वाऱ्या येऊ लागल्या.

 असाागरिया नांवाचे फार प्राचीन असे एक देवालय आहे व त्यांत बुध्दाची प्रचंड मूर्ति आहे. तेराव्या शतकांतील गदलदेन्या आणि लंकातिलक नांवाची सुंदर मंदिरें कॅंडीपासून ९ मैलावर आहेत. आणि तिकड जाणारी सडक "पेराडेनिया" नांवाच्या बागेजवळून जाते. लंकातिलक देऊळ उंच टेकडीवर आहे व तेथून अप्रतिम सृष्टिसौन्दर्य दिसते. या