पान:लंकादर्शनम्.pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



९९

 हिंदुस्थानांत माध्यमिक शिक्षणाकरितां जितकी फी द्यावी लागते तिच्या तिप्पट फी सिलोनमध्ये द्यावी लागते. औद्योगिक शिक्षणाची उत्तम सोय कोठेही नाही. या द्विपांत युनिव्हर्सिटि सुरूं होण्यापूर्वी विद्यार्थी 'केंब्रिज स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन,' 'लंडन मॅट्रिक्युलेशन' व 'इंटरमिजिएट एक्झामिनेशन' या परीक्षांना बसत. लंडन बी. ए. किंवा बी. एस्. सी. च्या परीक्षेकरितांही कांहीं विद्यार्थी खासगी तऱ्हेने तयारी करीत. १९३० च्या सुमारास सीलोन मध्ये युनिव्हर्सिटी स्थापन झालेली आहे. गेल्या दोन तीन वर्षांत सीलोनमध्ये सुशिक्षित तरुणांत बेकारी माजलेली आहे व बेकारीच्या प्रश्नाकडे तेथील जनतेचे व सरकारचे लक्ष्य गेलेले आहे.

 धार्मिक शिक्षणः– बुद्ध धर्माचा प्रसार या द्वीपांत फार प्राचीनकाळी झाला पण पोर्तुगीजांची सत्ता स्थापन झाल्यावर त्यांनी बुद्धधर्माची पाडाव करण्याकरितां नाना प्रयत्न केले. पोर्तुगीजांनीं एक कायदा असा केला होता की, ज्यांची लग्ने क्याथोलिक धर्माप्रमाणे झाली नसतील त्यांच्या संततीस त्यांचे कायदेशीर वारस समजण्यात येऊ नये, यामुळे अनेक गृहस्थ जरी बौद्ध धर्मास मानीत तरी वारसहक्काकरितां ते आपला लग्नावधि पाद्यांकडून करवीत व तो चर्चमध्ये नोंदवीत. याचा साहजिक परिणाम असा झाला की, कोलंबोसारख्या पोतुर्गीज वस्तीच्या ठिकाणी बौद्धभिक्षुंचे दर्शनही मिळणे कठीण झालें.

 इंग्लिशांच्या अमदानींत बौद्ध धर्माला कोणत्याही प्रकारे त्रास झाला नाहीं; एवढेच नव्हे तर बौद्ध विहारांना पूर्वीच्या राजांनी दिलेलीं इनामें कायम झाली व इंग्लिश अधिकाऱ्यांनी बुद्धधर्मीय उत्सवादिकांस व्यत्यय येऊ दिला नाहीं. पुष्कळशा इंग्रज विद्वानांनी बुद्धधर्मावर इंग्रजीत पुस्तकें लिहिली व पालीटेक्स्ट बुककामटीने तिपटक [ बुद्धधर्मग्रंथांचे नांव ] रोमन लिपीत छापून प्रसिद्ध केले. या सर्व गोष्टीमुळे बुद्धधर्माच्या अध्ययनास चालना मिळाली व कोलंबो येथे "विद्योदय विद्यालय" नांवाचा मठ स्थापन झाला व तेथे पाली व संस्कृत भाषांचे अध्ययन करण्याची सोय