पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/84

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हिंदूंनी आपले पंचवीस टक्के अधिकार स्वखुशीने मुसलमानांना बहाल करावेत आणि आपले नुकसान करून घ्यावे अशी जीनांची अपेक्षा होती. असे त्यांनी केले असते तरच जीना त्यांना सहिष्णू आणि उदारमतवादी म्हणायला तयार होते, मुस्लिम उदारमतवादाचा हा पल्ला एकदा नीट समजावून घेतला पाहिजे. कारण जीना मुस्लिम उदारमतवादी म्हणून ओळखले जातात, पण लोकशाहीच्या चौकटीत आपले अल्पसंख्यांक हे स्थान न स्वीकारण्याची त्यांची भूमिका होती. कारण सत्ता मुसलमानांच्याच हातात असली पाहिजे ही सुशिक्षित मुसलमानांची धारणा नेहमीच होती व आहे. जीना त्याला अपवाद नव्हते. भारतात जिथे मुसलमान अल्पसंख्यांक आहेत तिथे ती मुसलमानांच्या हाती येणे शक्य नाही हे जीनांना कळत होते. याकरिताच त्यांनी सत्तेच्या भागीदारीची. कल्पना मांडली. ती मिळत नाही असे पाहताच, मुस्लिम बहुसंख्यांक वस्तीचे वेगळे राज्य मागितले. कारण मुसलमान बहुसंख्यांक असलेल्या प्रदेशातच मुसलमानांच्याच हातात सत्ता येणे शक्य होते. धर्मनिष्ठ मंडळीप्रमाणे भारताची सत्ता मुसलमानांच्याच हाती असली पाहिजे असे ते म्हणू शकत नव्हते. तसे म्हणूनदेखील आजच्या लोकशाहीच्या आधुनिक जगात ती मिळणेही शक्य नाही हे त्यांना समजत होते. ते उदार होते, धर्मसहिष्णू होते, म्हणून त्यांनी मुस्लिम धर्मवाद्यांप्रमाणे सबंध भारतावर दावा केला नाही असा त्याचा अर्थ होत नाही. सबंध हिंदुस्थान मुसलमानांच्या सत्तेच्या टाचेखाली यावयास तो मुस्लिम बहुसंख्यांक होणे आवश्यक होते. याकरिता हिंदूंच्या धर्मांतराची प्रचंड प्रक्रिया चालू करणे आवश्यक होते. परंतु सातशे वर्षांच्या मुस्लिम सत्तेने जे साध्य झाले नाही ते आधुनिक काळात भारत स्वतंत्र झाल्यानंतर शक्य होऊ शकणार नाही हे त्यांना कळत होते. कारण आता सत्तेत हिंदूचा वाटा अधिक राहणार होता. या दृष्टीने ते कठोर वास्तववादी होते. मुस्लिम उलेमाप्रमाणे स्वप्नदर्शी नव्हते. एक तर आधुनिक काळातील सत्तेचे महत्त्व ते ओळखत होते. तिच्याखेरीज जगाचे नकाशे बदलता येत नाहीत याचे त्यांना ज्ञान होते. दुसरे असे की सर्व सुशिक्षित मुसलमानांत असलेला ताबडतोब सत्ता हस्तगत करण्याचा हव्यास त्यांना होता. कधी काळी भारत इस्लाममय करण्याच्या ईर्येसाठी मुसलमानांनी आज त्याग करावा अशी उलेमांची धारणा होती, तर कधी काळी भारत इस्लाममय करण्याचे स्वप्न बाळगण्याचे टाकून आता मिळेल ती सत्ता मुसलमानांनी घ्यावी आणि मग तिचा आपल्या सामर्थ्यावर विकास करावा ही जीनांची धारणा होती.

 मुसलमानांची वेगळी सत्ता ह्या घडीलाच प्रस्थापित करावी एवढ्यापुरते जीनांचे स्वप्न मर्यादित नव्हते. त्यांना बहुसंख्येने मुसलमानांच्या हातात सत्ता राहील असे राज्य तर हवेच होते, परंतु फाळणीआधी हिंदूंबरोबर समान भागीदारीच्या त्यांनी उराशी बाळगलेल्या सिद्धांताचे रूपांतर त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात समान प्रादेशिक भागीदारी झाली पाहिजे या सिद्धांतात केले. पाकिस्तान होईपर्यंत ते मुसलमानांत हिंदूविरोध वाढवीत राहिले. पाकिस्तान होताच पाकिस्तानातील अल्पसंख्यांक हिंदूंबाबतचा त्यांचा विरोध मावळला आणि भारतातील बहसंख्यांक हिंदंविरुद्ध तो पुढे चालू राहीला. पाकिस्तान हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र राहिल ही त्यांनी पाकिस्तानच्या जन्मानंतर घेतलेली भूमिका आणि भारताबरोबर चालू ठेवलेला संघर्ष या दोन परस्परविरोधी भूमिकांचा नीट अर्थ लावला पाहिजे. हा संघर्ष हिंदू जमातीविरुद्ध म्हणून

भारत - पाक संबंध/८३