पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1211

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

movement (पुढे नेण्याचा) जोर m, झपाटा m, ओढ f. २ the force which impels or drives, an overpowering influence ओढ f, पूर्ण कहा m, ताबा m, अम्मल m, पगडा m. ३ course or direction along which any thing is driven रस्ता m, मार्ग m, दिशा f, प्रवाह m. ओघ m, गति f. ४ object aimed at or intended intention, aim रोख m, कटाक्ष m, धोरण n, हेतु m, उद्देश m, अभिप्राय m. ५ import or meaning of sentence भावार्थ m, तात्पर्य n, आशय m, मतलब m अभिप्राय n. ६ that which is driven, forced, or urged along ढकललेली-लोटलेली वस्तु f, ढीग (loosely, m; as, "A D. of snow." ७ mech. ( slightly tapered tool of steel for enlarging or shaping a hole in metal by being driven into it (धातूस पाडलेले भोंक मोठे करण्याचा पोलादी) टोकदार-निमुळता सामता m, घिशीमध्ये चावी (चक्रांतील) ठोकण्याचे हत्यार n. ८ (mining) a passage driven or cut between shaft & shaft, a small subterranean gallery, a tunnel दोन विहिरींमध्ये-खाड्यांमध्ये भादलला-पाडलेला रस्ता m, जमिनीखालची ग्यालरी f, अन्तभौम मार्ग m, (भूम्यंतर्गत) बोगदा m, सुरंग m, खनक m. ९ the difference between the size of a bolt & the hole into which it is driven खिळा व ताे मारण्याचे भोंक यांच्या आकारांमधील अंतर n. D. v. i. to float or be driven along by (a current water ) वाहणे, (ओघा-प्रवाहाबरोबर ) वाहत जाणे. २ to accumulate in heaps by the force of wind वाऱ्याच्या जोराने वाहत जाऊन ) चा ढीग जमणे-रास होणे-डोंगर बनणे. ३ (mining) to examine a vein or the purpose of ascertaining the presence of metals or ores (धातूंकरिता खाणीची) शीर शोधणे. D. v. t. to drive or carry away वाहून नेणे, ओघाबरोबर नेणे. २ to drive into heaps (वाहत नेऊन) ढीग रचणे-रास पाडणे. ३ mech. to enlarge or shape, as a hole, an a drift (सामत्याने भोंक) मोठे करणे-बेतवार करणे-आंकारांत आणणे. D. o. movable by wind, that is drifted वाऱ्याने उडत-वाहत जाणारा, प्रवाहाने लोटीत नेलेला. Drift'age n. ( ठरलेल्या मार्गातून वाऱ्याच्या योगामे झालेलें जहाजाचे) विचलन n. Drift-anchor n. जहाज प्रवाहाबरोबर वाहत जाऊ नये म्हणून त्याला बांधलेला नांगर m. Drift-bolt n. खिळे उपटण्याचा स्क्रू m. Drift-ice n. (प्रवाहाबरोबर) वाहत जाणारें बर्फ n. Drift'less_a. हेतुरहित, उद्देश-अभिप्रायरहित-वांचून, योजनारहित. Drift-sail n. नियमित मार्गातून जहाजाचे विचलन होऊ नये म्हणून लावलेलें शीड n, स्थिरावतें शीड n. Drill (dril) [Dut. drillen, to bore or drill (soldiers).] v.t. (सामत्याने) भोंक पाडणे, विंधणे, वेधणे. २ to train in the military art कवाईत शिकविणे, सैन्यविन्यास शिकवणे. लष्करी तालीम f, कवाईत f. देणे.