Jump to content

पान:राखेखालचे निखारे (Rakhekhalche Nikhare).pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समाजाची संख्या जोपर्यंत वाढत आहे, तोपर्यंत कोणीतरी त्या सर्वांना आपलीशी आणि आत्मसन्मानाची वाटेल, अशी शब्दसंहती शोधून काढली नाही तर पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होईल आणि समाजवादाच्या पाडावानंतर धर्मकारण उफाळून वर आले त्याप्रमाणे प्रांतिक क्षुद्रवाद उफाळून येतील आणि चर्चिलचे भाकीत खरे ठरून देशाचे तुकडे पडण्याची परिस्थिती तयार होईल. हा धोका उघड दिसतो आहे.

(दै. लोकसत्ता दि. ७ ऑगस्ट २०१३ )

राखेखालचे निखारे / ७२