पान:युगान्त (Yugant).pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२४ / युगान्त

उघड्या डोळ्यांनी त्याला संहार बघावा लागला. उघड्या कानांनी कुरुस्त्रियांचे रडणे ऐकावे लागले. ही विटंबना पुरी वाटली नाही म्हणूनच की काय, महाभारतात भर घालणाऱ्या मागाहूनच्या लोकांनी शांतिपर्वाचे चऱ्हाट त्याच्या तोंडून वदवले.
 म्हणजे भीष्माने प्रतिज्ञापालनाने साधले काय, हा प्रश्न उरतोच.

 मे, १९६५