पान:यांचे सध्या काय चाललेय...(Yanche Sadhya Kay Chalaley...).pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संज्या : सोने, मनात अन् विचारांत बदल काय होतात गं? सोने : आरं, आता तुला वेगळे वाटायला लागलंय ना. म्हणजे झकास दिसावं, मित्रांबरोबर असावं, पोरींकडे बघावं, माझं मला कळतं, आईबाबांना आमचं काही माहित नाही. संज्या : पोरींना वाटतं का गं पोरांकडे बघावं. सोनी : वाटतं तर काय ! मस्त वाटतं पण भीती पण वाटते. एखाद्या पोरानं बघताना बघितलं, नावं जोडली, चिठ्ठी पाठवलीतर घरचे लगेच आमची शाळाच बंद करतात. तुम्हाला काय, फार फार तर मार खावा लागलं संज्या : त्ये बी खरंच! सोने : संज्या, प्लीज बंड्याला सांग की शीतलीला त्रास देऊ नको. लई हुशार आहे ती. तिची शाळा बंद होईल. त्यांचे बापू भयंकर आहेत. 40