हे पान प्रमाणित केलेले आहे.
सांगा. हा चरखा शेतकऱ्याच्या हाती देण्याचे काम गेल्या २७ तासांच्या ज्ञानयज्ञाने केलेले आहे.
वसा उत्तमशेतीचा
शेतकऱ्याच्या शेतामध्ये लक्ष्मी आली आहे. देशातल्या इतर लोकांची दिवाळी पंधरा दिवसांपूर्वी झाली. शेतकऱ्याच्या शेतात आलेल्या लक्ष्मीच्या पूजनाचे काम आपण गेले तीन दिवस येथे केले. या खुल्या अधिवेशनाच्या शेवटी तुम्हा सर्वांच्या बरोबरीने मी एकत्र प्रार्थना करेन की शेतकऱ्याच्या शेतात आलेल्या या नव्या अवतारातील लक्ष्मीचे पूजन भक्तिभावाने करू या, निष्ठेने करू या आणि संपूर्ण शेतीव्यवसायाचा चेहरामोहरा बदलवून, स्वातंत्र्य मिळण्याआधी आणि नेहरूंचे काळेकुट्ट राज्य येण्याआधी शेती जशी उत्तम होती तशी शेती पुन्हा एकदा उत्तम झाल्याचे पाहू या.
(१० नोव्हेंबर २००८ - शेतकरी संघटना ११वे अधिवेशन, औरंगाबाद.)
(शेतकरी संघटक २१ डिसेंबर २००८)
◼◼
माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ३०९