होईल.
खासगी सावकार
सरकारने कर्जमाफीची घोषणा केली - फाटकी तुटकी, फक्त छोट्या शेतकऱ्यांनाच; त्यातही व्यापारी बँकांच्या कर्जदारांनाच, खासगी सावकरांच्या कर्जदारांना नाही. - काय असेल ते असो. खासगी सावकारांसंबंधी वादाचे जनक हे सांगली जिल्ह्यातीलच. आर. आर. पाटील विदर्भातला खासगी सावकार कोण असतो? जो किराणा मालाचे दुकान चालवतो, जो कापडाचे दुकान चालवतो आणि शेतकऱ्याकडे वर्षातून एकदाच पैसा येतो हे लक्षात घेऊन शेतकऱ्याला किराणा माल आणि कापडचोपड उधारीवर देतो तो व्यापारी म्हणजे सावकार अशी विदर्भात खासगी सावकाराची व्याख्या आहे. आर. आर. पाटील यांनी घोषणा केली की खासगी सावकाराचे पैसे बुडवा. त्याचा परिणाम असा झाला की विदर्भातील साऱ्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना माल उधार देणे बंद केले. आर. आर. पाटलांच्या या घोषणेनंतर विदर्भात ज्या काही आत्महत्या झाल्या त्या आत्महत्येचे पाप त्यांच्या माथी बसेल. त्यांना खासगी सावकार कोण आहे, तो शेतकऱ्याला उधार का देतो हेही माहीत नाही. हे सरळ सरळ शेतकऱ्यांचे शत्रू आहेत. वस्तुस्थिती लक्षात न घेता शेतकऱ्यांच्या सेवेसारख्या क्षेत्रात मुद्दाम जुना शेटजी-भटजी वाद आणून जे खासगी सावकारांच्या विरुद्ध विष ओकू पाहतात ते शेतकऱ्यांचा घात करणारे आहेत हेसुद्धा लक्षात घ्यायला हवे.
आर्थिक आघाडीवरील घटना
२९ फेब्रुवारी २००८ रोजी वित्तमंत्र्यांचे शेतकऱ्यांना कर्जमाफी व सूट सवलत योजना जाहीर करणारे भाषण झाले आणि त्यानंतर ७ मार्चला म्हणजे फक्त ७ दिवसांनी काय काय घडले?
या सात दिवसांत सगळीकडे आरडाओरड सुरू झाली की सगळीकडे महागाई वाढत आहे. महागाई वाढते आहे म्हणजे लोकांना प्रामुख्याने अन्नधान्य महाग होत आहे, भाजीपाला महाग होत आहे, खाद्यतेल महाग होत आहे असे म्हणायचे असे. मग सरकारने म्हणजे वित्तमंत्री पी.चिदंबरम् आणि व्यापारमंत्री कमलनाथ यांनी महागाईवर उपाय म्हणून परदेशातील खाद्यतेलावरील आयातशुल्क माफ करून त्याच्या आयातीला मुक्तद्वार दिले. आयात करून शहरातील ग्राहकाला खुश केले हे चांगले झाले पण त्याचा देशातील शेतकऱ्यांवर काय परिणाम होईल याची त्यांनी फिकीर बाळगली नाही. देशात स्वस्त खाद्यतेल आले आणि देशांतर्गत खाद्यतेलाच्या किमती पडल्या तर शेतकरी सरळसरळ विचार करील की पुढच्या वर्षी मी भुईमूग किंवा इतर तेलबिया कशाकरिता पेरू? परिणामी,
पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२७७
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २७७