पाईकांनी चांगली लढाई केली; निसर्गानेही साथ दिली; पण हे आंदोलन महाराष्ट्रात सर्वदूर झाले नाही, शेतकरी संघटनेने तयार केलेल्या 'शेतकरी तितका एक एक' या जाणिवेत थोडी ढील पडल्यासारखे झाले. मराठवाडा, विदर्भच नव्हे तर नाशिक भागातही या आंदोलनाला म्हणावी तितकी धार आली नाही. कदाचित् या भागांतील उसउत्पादक शेतकऱ्यांना आपण घोषित केलेला १५०० रुपयांचा भाव जवळिकीचा वाटला नसावा. आपण भाव ठरवला १२% साखर उतारा धरून. १०% च्या खाली साखर उतारा असलेल्या भागातील शेतकऱ्यांना तो आपला वाटला नसावा, त्यामुळे लढाईत ढील पडली असावी.
कोणत्याही मालाचे भाव काढण्याचे मार्ग दोन आहेत. शेतकरी संघटनेची मुळातील मागणी, उत्पादनखर्च भरून देणारा भाव मिळाला पाहिजे, ही आहे. सरकारने जर निर्यातबंदी केली नाही, जीवनावश्यक वस्तू कायद्यासारखी बंधने आणली नाहीत तर असा भाव खुल्या बाजारात शेतकऱ्याला मिळतो. सरकार शेतीमालाच्या बाजारपेठेत हस्तक्षेप करते म्हणून शेतीमालाला रास्त भाव मिळत नाही. तेव्हा सरकारी हस्तक्षेपातून मुक्त बाजारपेठेत काय भाव मिळू शकेल याचा हिशोब करणे ही भाव काढण्याची एक पद्धती झाली.
दुसरी पद्धत म्हणजे शेतकऱ्याला शेतामध्ये माल पिकवायला उत्पादनखर्च किती येतो याचा हिशोब काढणे. कोणी काहीही म्हणो, शेतकऱ्याला ऊस पिकवायला जितका खर्च येतो तितका भाव मिळू नये असे सांगण्याचा अधिकार कोणा अफजलखानाला नाही आणि त्याच्या आदिलशहालाही नाही.
आपण या परिषदेच्या निमित्ताने उसाच्या उत्पादनखर्चाचा तुलनात्मक अभ्यास केला आहे. 'कृषी उत्पादनखर्च व मूल्य आयोगा'ने उसाचा उत्पादनखर्च काढताना वेगवेगळ्या कामांवरील खर्चाचे जे आकडे घेतले आहेत ते प्रत्यक्षात होणाऱ्या खर्चापेक्षा कितीतरी कमी आणि वास्तविकतेची पातळी सोडणारे असल्याचे आपल्या लक्षात आले आहे. त्यामुळे, या आयोगावर बंधन घातले पाहिजे, त्याच्या अध्यक्षावर आणि सदस्यांवर जबाबदारी टाकली पाहिजे की तुम्ही जी आकडेवारी फेकून उत्पादन खर्च जाहीर करता त्या खर्चात तुम्ही पिकवून दाखविले पाहिजे. तसे करताना नुकसान सोसावे लागले की अशा वेड्यावाकड्या शिफारशी ते करणार नाहीत असे वाटते.
उत्पादनखर्चाचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी ऊस आंदोलनाच्या सेनापतींनी जो हिशोब मांडला आहे तो मी बारकाईने पाहिला. शेतकरी संघटनेचा उत्पादनखर्चाचा व भावाचा आकडा ठरविण्यासाठी त्यांनी खर्चातील आकडे मोठ्या काटकसरीने धरले आहेत आणि २१४९ ची मागणी केली आहे. माझ्या
पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२४५
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २४५