Jump to content

पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१९१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


नांगर मोडून तलवार घ्या हाती



 कृष्णा खोरे प्रकल्पाच्या उभारणीसंबंधी चाललेली चालढकल, अनुशेषाच्या नावाखाली पैसे भरून कनेक्शन न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे विजेच्या बाबतीत होणारे हाल आणि शेतकरी संघटनेने प्रदीर्घ लढा देऊन उसावरील जी झोनबंदी उठविण्यात यश मिळविले ती झोनबंदी छुप्या मार्गाने आणण्याचा सरकारचा प्रयत्न या सर्व गोष्टींनी पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी जेरीस आला आहे. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना तळमळ लागली की या परिस्थितीत शेतकऱ्यांची बाजू घेण्यासाठी काही तरी करायला पाहिजे. काय करता येईल ते ठरविण्यासाठी सांगलीतील आजचा हा मेळावा आहे. केवळ दहा दिवसांच्या प्रचाराने एवढ्या मोठ्या संख्येने शेतकरी जमा झाले ही विशेष बाब आहे. जवळ वाहने नाहीत, इतर काही साधने नाहीत अशा परिस्थितीत इतक्या सर्वांना या मेळाव्याचा निरोप येथील कार्यकर्त्यांनी दिला याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच होईल.
 सरकारची शेतकरी धोरणं दुष्ट आहेत आणि त्यांचा विरोध करण्यासाठी मी काहीतरी असा जालीम कार्यक्रम द्यावा की सगळे प्रश्न एका झटक्यासरशी सुटून जातील अशी हा मेळावा भरवणारांची आणि मेळाव्याला आलेल्या तुम्हा सर्वांची अपेक्षा दिसते. असा एका फटक्यात रोग घालविण्याचे औषध सांगणारा डॉक्टर मी नाही. असे डॉक्टर येऊन गेले आणि औषधाच्या नावाखाली ते आपल्याला विष पाजून गेले हा आतापर्यंतचा आपला अनुभव आहे.
 मी वीस वर्षांपूर्वी सांगलीला सभा घेण्यासाठी आलो होतो तेव्हा या भागातील सगळं वातावरण सहकारमय होतं. ज्यांनी ज्यांनी सहकारी कारखाने काढले ते सर्व शेतकऱ्यांचे देव होते. शेतकऱ्यांचे जे काही कल्याण झालेले आहे ते केवळ साखर कारखान्यांमुळे, त्यांच्याविषयी जरासुद्धा वेडंवाकडं बोलायचं नाही असं वातावरण इथं होतं. अशा त्या काळामध्ये मी गावोगाव सभा घेतल्या. त्यात दोन प्रमुख मुद्दे मी मांडले. पहिला मुद्दा – ज्वारी पिकवा का ऊस पिकवा, शेतकऱ्याच्या

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १९१