परिणामी, दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटले. या दुसऱ्या महायुद्धात जग आणखी बेचिराख झाले.
सारांश, जागतिक व्यापार टाळायचा प्रयत्न केला तर 'हिटलर' चा उदय होतो; व्यापार बंद होतो, युद्ध होते. व्यापाराला पर्याय फक्त युद्ध आहे.
मागल्यास ठेच, पुढचा शहाणा
दुसरे महायुद्धसुद्धा संपले, जर्मनी हरला. यावेळी अमेरिका दोस्त राष्ट्रांच्या बरोबर होती. अमेरिकेने ठरवले की गेल्या वेळची चूक आपण करायची नाही. कारण, गेल्यावेळी शरणागत जर्मनीवर खंडणी लादली आणि पुन्हा महायुद्ध झाले. यापूढे खंडणी लादण्याऐवजी 'उलट खंडणी' द्यायची. म्हणजे जेत्या देशाने पराभूत देशाला खंडणी देण्याचा 'मार्शल प्लॅन' अमेरिकेने पराभूत राष्ट्रांसमोर ठेवला. त्या प्लॅनने मार्शलच्या कल्पनेनुसार योग्य तो परिणाम साधला आणि पराभूत देशांच्या अर्थव्यवस्था सावरल्या गेल्या.
जागतिक व्यापारचर्चा
दोन महायुद्धांच्या दाहक अनुभवानंतर सगळ्या देशांनी एकत्र येऊन ठरवले की हिटलरच्या कारवायांमुळे जगाचा जो व्यापार संपला तो आंतरराष्ट्रीय व्यापार पुन्हा चालू करणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. या व्यापाराचे नीतिनियम तयार करण्याकरिता एकमेकांत विचारविनिमय व्हावा यासाठी त्यांनी General Agreement on Tariff and Trade (GATT) नावाची संस्था स्थापन केली. १९४२-४३ सालापासून चर्चा सुरू झाली. त्याकाळी सर्व देशातील 'स्वदेशी जागरण मंच' वाल्यांचा जोर होता. त्यात सदस्य राष्ट्रांपैकी एका बाजूला समाजवादी रशिया, सर्व जगाशी जोडणारे सर्व दरवाजे बंद करून आमचे आम्ही राज्य चालवू असे म्हणणारे होते. त्यामुळे वाटाघाटीत यश येत नव्हते. चर्चांचे गुऱ्हाळ बरीच वर्षे चालल्यानंतर अखेरी वाटाघाटीत यशाचे चिन्ह दिसू लागले आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात चांगले वागणे म्हणजे काय यासंबंधी नियम ठरविण्यात आले आणि त्या नियमांचे पालन व्यवस्थित होते आहे ना याकडे लक्ष ठेवण्यासाठी एक संस्था जन्माला आली तिचे नाव जागतिक व्यापार संघटना (World Trade Organisation) म्हणजेच संक्षेपाने WTO.
WTO आणि हिंदुस्थान
विश्वनाथ प्रतापसिंग पंतप्रधान असताना या वाटाघाटींतून तयार झालेला व्यापारासंबंधी नेमनियमांचा मसुदा त्यांनी माझ्याकडे पाठवला. तो पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आले की मोठा चमत्कार झाला आहे. सगळ्या जागतिक व्यापारात अमेरिकेचा हिस्सा ५१% आणि हिंदुस्थानचा हिस्सा ०.१%. खरे तर ५१%
पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१७०
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १७०