संख्यावाचक शब्द वापरायला हवा होता. शेतकरी संघटनेने ते काम केलं आहे. मार्क्सचा अर्थवाद आम्ही फेकून दिला आहे पण तत्त्वज्ञानामध्ये त्याने केलेली जडवादी इतिहासाची मांडणी हा शेतकरी संघटनेच्या विचारांचा महत्त्वाचा पाया आहे.
म्हणूनच, मनुष्याच्या जगण्यामागील 'स्वातंत्र्याच्या कक्षा' रुंदावण्याच्या प्रेरणेला वाव देणाऱ्या, प्रत्येक व्यक्तीच्या अनन्यसाधारणपणाची जोपासना करणाऱ्या, योजक उद्योजकांच्या संस्कृतीचे स्वागत करणे हा शेतकरी संघटनेचा यापुढील कार्यक्रम असणार आहे.
आज देशात अस्तित्वात असलेल्या सर्व राजकीय संघटना येऊ घातलेल्या या संस्कृतीचं स्वागत करायचं तर सोडाच तिला दाराबाहेरच रोखून धरण्याच्या प्रयत्नात आहे. बांडगुळ नोकरशाही, कामगारही तिच्या विरोधात आहेत. अशा वेळी प्रत्येक व्यक्तीच्या स्वतंत्रतेची आणि अनन्य साधारणत्वाची बूज राखणारा राजकीय पर्याय अपरिहार्यतेने आवश्यक आहे.
(सप्टेंबर १९९४ प्रशिक्षण शिबीर मुंबई)
(शेतकरी संघटक २१ सप्टेंबर १९९४)
◼◼