दुःख होतं, घनघोर भूक होती, घनघोर दारिद्र्य होते, घनघोर रोगराई होती त्यावेळी स्वतःचं बघण्यापलीकडे लोकांचं काम केलं, त्यांच्या दुःखावर फुंकर घातली तर ते श्रेष्ठ मानण्याची शिकवण होती. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे,
न स्वर्गम् न पुनर्भवम्
कामये दुःखतप्तानाम्
प्राणिनाम् आर्तिनाशनम्
मनुष्य प्राण्याने कामना कशाची करायची? राज्य नको, स्वर्ग नको, पुनर्जन्मही नको परंतु दुःखामुळे तप्त झालेल्या लोकांचं दुःख कमी करण्याचं भाग्य मला लाभावं अशी कामना धरणे हे पुरुषार्थाचं गमक मानलं जातं होतं. त्या काळात लोककल्याणकारक समाजवादाची प्रेरणा उगम पावली.
आतिथ्य आणि भिक्षा
शेतकऱ्यांनी खळ्यामध्ये पीक उभं करावं, जे कोणी गरजू, भुकेले येतील त्यांच्या पोटाला द्यावं, त्यांची भूक शमन करावी हा 'आर्तिनाशना'चा नवा वेगळा अर्थ तयार झाला. ज्यांच्याकडे शेती नाही, उत्पादनाची इतर साधनं नाहीत त्यांना उत्पादक घटकांनी खाऊ घालावं असा आर्तिनाशनाचा नवा अवतार अतिथ्याच्या रूपाने तयार झाला आणि त्याला समाजामध्ये इतकी मान्यता मिळाली की भीक मागणे हा धर्म झाला. भिक्षुकांच्या झुंडीच्या झुंडी जे उत्पादन करणारे लोक आहेत त्यांच्या दाराशी जाऊन भीक वाढा असं म्हणायच्या ऐवजी, मला भूक लागली आहे म्हणून याचना करण्याऐवजी मी धर्माचं, अध्यात्माचं काम करतो, मी मोक्षाचं साधन करतो आहे; तुम्ही सर्वसामान्य संसारी माणसं आहात, या संसाराच्या चिखलामध्ये रुतला आहात; तुमच्या कल्याणाकरिता, पुण्य प्राप्तीकरता माझं पोट भरा असं सांगायला लागल्या. भिक्षा मागण्यामध्ये काही लाज नाही एवढंच नव्हे तर पाच घरी जाऊन भीक मागून मी माझं पोट भरतो आणि बाकीच्या वेळी ध्यान, तपस्या, अध्ययन करतो असा गर्व बाळगत भिडूंचे इतके की भिक्षुक 'मला धर्म वाढा, नाही तर तुम्हाला पाप लागले' असं धमकावणाच्या पायरीवर पोहोचले.
संतांचा समाजवाद
आतिथ्य आणि भीक हे आर्तिनाशनाचे दोन टप्पे झाले. औद्योगिक क्रांतीने शेतीवरून माणसं बाहेर निघाली, शहरात जाऊन राहू लागली तेव्हा पुन्हा एकदा समाजातील विषमतेची जाणीव झाली. मग शहरांमध्ये जी गरीब माणसं आहेत