Jump to content

पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/१०३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उचलू नयेत.
 या वाकर्ला गावामध्ये हलर काढला. हे भाषण करताना मलाही माहीत नाही की पोलिसांनी काय करायचं ठरवलंय ते? कदाचित निघायच्या आधीसुद्धा अटक होण्याची शक्यता आहे. झालीच तर चांगलंच आहे. आपण सगळेच जण जाऊ तुरुंगात, बरं होईल आपली भाकरीची सोय होईल. अटक झाली नाही तर मी या गावातल्या सगळ्या भावांवर एक जबाबदारी सोपवून जातो आहे. मी इथून गेल्यानंतर, माझ्या हस्ते उद्घाटन झालेल्या हलरचा बचाव करण्याची आणि संरक्षण करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. जर का कोणीही कायद्याने, कायद्याचा गणवेश घालणाऱ्या माणसांनी हा हलर बंद करण्याचा किंवा उचलून नेण्याचा प्रयत्न केला तर पहिली जबाबदारी मी महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांना देतो; आवातल्या प्रत्येक महिलेने या हलरच्या जवळ उभं राहून तुम्हाला अटक झाल्याखेरीज हलरला कोणी हात लावू शकणार नाही याची काळजी घ्या आणि ही जबाबदारी येथे जमलेल्या सर्वांवर आहे. हा हलर शेतकरी संघटेच्या प्रतिष्ठेचा आहे. याला जर कोणी हात लावायला आलं तर इथे जमलेल्या आजूबाजूच्या गावांतल्यासुद्धा शेतकऱ्यांनी येऊन इथं उभं राहून सत्याग्रह केला पाहिजे. वाकर्ल्याच्या आसपास दहाबारा गावांतील एकूण एक शेतकरी तुरुंगात गेल्याशिवाय पोलिसांना या हलरला हात लावता आला नाही पाहिजे. तोपर्यंत बाकीच्या जिल्ह्यातून. इतर राज्यांतूनही सत्याग्रही या हलरच्या संरक्षणासाठी मोठ्या संख्येने आलेले असतील.
 आम्ही एक गोष्ट मागितली. शेतकऱ्याला काय पाहिजे? शेतकऱ्याला स्वातंत्र्य पाहिजे. आम्ही कष्ट करताना गाळलेल्या घामाचं दाम मिळालं पाहिजे ही आमची मागणी आहे. कालच्या कार्यकारिणीच्या सभेत मी सांगितलं, ८० सालापासून आम्ही घसा फोडून सांगतो आहोत की, शेतकऱ्याला लुटायचा हा उद्योग चालू आहे आणि बाकीचे लोक म्हणायचे की, "शेतकऱ्याची फार मजा असते. शेतकऱ्यांना किती सबसिडी मिळते, शेतकऱ्याला वीज स्वस्त मिळते, शेतकऱ्याला पाणी स्वस्त मिळतं आणि वर इन्कमटॅक्स नाही." अरे पण शेतकऱ्याला मुळात लुटत असाल तर टॅक्स असेल कुठून? आम्ही सांगत होतो की शेतकऱ्याला सबसिडी नाही, शेतकऱ्याला खत महाग आहे; खताची सबसिडी महणतात ती शेतकऱ्याला भेटत नाही, ती कारखानदार खाऊन जातात. शेतकऱ्यांना वीज कशी मिळते? दिल्लीमध्ये वित्तमंत्री मला म्हणाले की, "जगाच्या मानाने हिंदुस्थानातली वीज फार स्वस्त आहे. जी वीज तयार करायचा खर्च १ रु. ३० पैसे येतो त्यासाठी आमची अशी इच्छा आहे, की शेतकऱ्यांनी निदान ५० पैसे द्यावेत." मी त्यांना म्हटलं की, "गावातली वीज कशी येते तुम्ही बघितली काय? परदेशामध्ये

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / १०३